मुंबईतील वीजपुरवठा तासाभरात सुरळीत होईल; ऊर्जामंत्र्यांचे आश्वासन

ग्रीड फेल्युअरमुळे बिघाड झाल्याने लालबाग, परळ, अंधेरी, दादर, ठाणे, वडाळा येथील गेली लाईट

0

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई आणि लगतच्या परिसरातील अनेक भागांतील वीजप्रवाह सोमवारी सकाळी अचानकपणे खंडित झाल्याची घटना घडली.  लालबाग, परळ, अंधेरी, दादर, ठाणे, वडाळा आणि नवी मुंबई या भागातील लाईट गेली आहे.

ग्रीड फेल्युअरमुळे हा बिघाड झाल्याचे समजते. अचानक लाईट गेल्यामुळे मुंबईतील पश्चिम आणि मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक लोक ट्रेन सध्या ट्रॅकवर उभ्या आहेत. याशिवाय, मुंबई परिसरात असणाऱ्या कॉर्पोरेट कार्यालयांमधील कामकाजही लाईट गेल्यामुळे ठप्प झाले आहे. हा बिघाड नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप खात्रीशीर माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. मात्र, बेस्टच्या काही अधिकाऱ्यांनी ग्रीड फेल्युअरमुळे हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तविली. मात्र, सध्या वीज पुरवठा करणाऱ्या सगळ्या यंत्रणा या बिघाडाचे कारण शोधण्यासाठी युद्धपातळीवर कामाला लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या काही भागांमध्ये अशाचप्रकारे वीजपुरवठा खंडित झाल्याचा प्रकार घडला होता. त्यावेळी दोन ते तीन तासांत वीजपुरवठा सुरळीत झाला होता. मात्र, आताचा बिघाड तुलनेत मोठा असल्याने मुंबईचा वीजपुरवठा सुरळीत होण्यास आणखी किती कालावधी लागेल, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मुंबईत इतक्या मोठ्या प्रमाणावर वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे मोठ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा तिन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी ट्रेनमध्ये अडकून पडले आहेत. ट्रेनमधील पंखे आणि लाईटही बंद झाले आहेत. याशिवाय, रस्त्यावरील सिग्नल आणि सीसीटीव्ही यंत्रणाही पूर्णपणे बंद पडली आहे. तसेच यामुळे सर्व भागांतील रुग्णालये आणि कोरोना केंद्रातील वीजपुरवठाही खंडित झाला आहे. वीजपुरवठा लवकर पूर्ववत न झाल्यास व्हेटिंलेटवर व इतर अत्यावश्यक उपचारांसाठी लागणारी यंत्रणा ठप्प होण्याचा धोका आहे. त्यामुळे हा वीजपुरवठा कधी सुरळीत होणार,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.