सणासुदीच्या तोंडावर मुंबईत दहशतवादी हल्ल्याची शक्यता, हाय अलर्ट

मुंबईमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला? पाकिस्तानमधून फोन, ताज हॉटेल उडवण्याची धमकी

0

मुंबई : सणासुदीच्या तोंडावर दहशतवादी मुंबईला टार्गेट करण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती  आहे. ड्रोनसदृश उपकरणातून हल्ला करण्याचा कट दहशतवाद्यांनी आखल्याचे समजते. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनंतर मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला असून सुरक्षेत वाढ करण्याची सूचना देण्यात आली आहे. तसेच मुंबई आणि परिसरात ड्रोन तसेच फ्लाईंग ऑब्जेक्ट्स उडवण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे.

सणासुदीच्या तोंडावर दहशतवादी मुंबईला टार्गेट करण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती  आहे. ड्रोनसदृश उपकरणातून हल्ला करण्याचा कट दहशतवाद्यांनी आखल्याचे समजते. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनंतर मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला असून सुरक्षेत वाढ करण्याची सूचना देण्यात आली आहे. सणासुदीच्या दिवसांना सुरुवात झाली असून याचाच गैरफायदा घेत दहशतवादी हल्ला करण्याच्या मनसुब्यात असल्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मुंबई पोलिसांनी यासंदर्भात सतर्कतेचा इशारा दिला आहे. यानुसार मुंबईत ड्रोन किंवा तत्सम गोष्टी उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. 30 ऑक्टोबरपासून 28 नोव्हेंबरपर्यंत ही बंदी असेल. 26 नोव्हेंबर 2008 हा दिवस मुंबईसाठी काळा दिवस ठरला होता. समुद्रमार्गाने आलेल्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मुंबईला वेठीस धरलं होते. पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मुंबईच्या ताज हॉटेलसोबतच इतर 6 ठिकाणांवर हल्ला केला होता. या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 166 लोक मृत्यूमुखी पडले होते, तर 300 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवर सर्वात जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. तर ताज हॉटेलमध्ये 31 लोकांचा मृत्यू झाला होता. सर्व दहशतवाद्यांपैकी फक्त एकाच दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आले होते, त्याचे नाव अजमल मोहम्मद कसाब. त्यानंतर 21 नोव्हेंबर 2012 रोजी कसाबला फाशी देण्यात आली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.