राज्यातील अतिवरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची शक्यता

राज्याचे पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर

0

मुंबई : राज्यातील अतिवरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे. राज्याचे पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर जात आहेत. त्यामुळे आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याची चिन्हे आहेत.

राज्याचे पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर जात आहेत. त्यामुळे आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याची चिन्हे आहेत.  बदल्या आणि नियुक्त्यांवरून महासंचालक सुबोध जयस्वालांचे राज्य सरकारशी मतभेद होते. त्यामुळे जयस्वाल यांनी केंद्र सरकारमधील प्रतिनियुक्तीचा पर्याय स्वीकारला, अशी चर्चा यामुळे दबक्या आवाजात सुरू झाली आहे. जयस्वाल हे तीन वर्षांपूर्वी मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी होते. त्यानंतर बढती मिळून ते पोलिस महासंचालक या पदावर रुजू झाले होते. सरकारसोबत जयस्वाल यांची मतं फारशी पटली नसल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा केंद्रात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटलं जात आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.