महिलाविषयक दृष्टीकोनात माध्यमात सकारात्मक बदल – प्रा. जयदेव डोळे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्रातर्फे‘ व्याख्यानमाला
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्रातर्फे आयोजित दहा दिवसीय लिंगभाव चर्चाविश्व या व्याख्यानमालेत प्रा.जयदेव डोळ बोलत होते. ‘कोराना‘नंतरच्या काळात समाज माध्यमांमधून स्त्रियांची प्रतिमा साचेबंद ऐवजी प्रगल्भतेने मांडली जाऊ लागली. हा बदल सकारात्मक व दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन माधमतज्ज्ञ प्रा.जयदेव डोळे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्रातर्फे आयोजित दहा दिवसीय लिंगभाव चर्चाविश्व या व्याख्यानमालेत प्रा.जयदेव डोळ बोलत होते. या विभागाच्या संचालक डॉ.स्मिता अवचार व समन्वयक प्रा.अश्विनी मोरे यांची उपस्थिती होती. ‘महिला व माध्यमे’ या विषयावर बोलताना प्रा.जयदेव डोळे म्हणाले, आपल्याला माध्यमांचे अर्थशास्त्र समजून घ्यायचे असेल तर सर्वप्रथम उद्देश समजून घेणे आवश्यक आहे, राज्यघटनेने स्त्री-पुरुष समता दिली आहे. माध्यमे मात्र आजपर्यंत अनेकवेळा स्त्रियांचे चित्रण एकांकागी, उथळ रितीनेच मांडले. यावेळी प्रा.जयदेव डोळे म्हणाले, कोरोनानंतरच्या काळात भांडवलदारांची माध्यमे व राजकीय पक्षांतर्गत ताब्यातील माध्यमे काही प्रमाणात मागे पडली आहेत. दुसरीकडे, विविध कार्यकर्ते, विचारांच्या मंडळींचे वेब पोर्टल, ऑनलाईन मीडियाला चांगले दिवस आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर महिला, शेतकरी व वंचित धारकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले जात आहेत. या घटकांनी जागृत होऊन माध्यमे, शासन व शैक्षणिक संस्थांत आपला सहभाग वाढवावा, असेही प्रा.डोळे म्हणाले. या व्याख्यानमालेत माध्यमे डॉ.कमला कन्नबिरन, डॉ.आनंद देशमुख, डॉ.शिवानंद भानुसे (छत्रपती शिवरायांचा महिला विषयक दृष्टिकोन), प्रा.स्वाती देहाडराय (लिंगभाव आणि शिक्षण), डॉ.दिलीप चव्हाण (लिंगभाव आणि भाषा), डॉ.आशा सिंह (लिंगभाव आणि भोजपुरी संस्कृती), डॉ.दुलारी कुरेशी (अजिंठा लेणीतील चित्र आणि लिंगभावात्मक दृष्टिकोन), प्रा.विभूती पटेल (लिंगभाव आणि विकास) तर अखेरच्या दिवशी प्रा स्मिता पाटील यांचे ‘लिंगभाव आणि डिकोलनायजेशन’ या विषयावर व्याख्यान होणार आहेत. कार्यशाळेच्या समन्वयक प्रा.अश्विनी मोरे यांनी सूत्रसंचालन तर पाहुण्यांचा परिचय व आभार मंजुश्री लांडगे यांनी मानले. कार्यक्रमासाठी डॉ.निर्मला जाधव, डॉ.सविता बहिरट संतोष लोखंडे डॉ.विकास टाचले, संजय पोळ यांनी परिश्रम घेतले.