पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण, अरुण राठोड पोलिसांच्या ताब्यात

चौकशी अहवालात अरुण राठोडचा महत्वाचा भाग अरुण राठोडच्या नावाने व्हायरल रेकॉर्डिंगचा अहवालात उल्लेख

0

पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गेल्या दहा दिवसांपासून गायब असलेला अरुण राठोडला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळत अरुण राठोडला ताब्यात घेतले.
आता याप्रकरणात त्याची चौकशी केली जाईल. अरुण राठोडची चौकशी थेट पोलिस आयुक्तालयात होण्याची शक्यता आहे. चौकशी अहवालात अरुण राठोडचा महत्वाचा भाग आहे. अरुण राठोडच्या नावाने व्हायरल रेकॉर्डिंगचा अहवालात उल्लेख आहे. यवतमाळ प्रकरणातही अरुण राठोड नामक व्यक्ती असल्याने संशय बळावला. पोलिस अहवालात विजय चव्हाणहीसोबत असल्याचा उल्लेख आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी वरिष्ठ पोलिस अधिकारी करणार आहेत. या प्रकरणात एकूण तीन पथके चौकशी करत आहेत. या अगोदर पूजाच्या आई वडिलांचा जबाबही घेण्यात आला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अद्यापही गुन्हा दाखल नाही, आकस्मिक मृत्यूचीच नोंद पोलिस दप्तरी आहे.

पूजा अरुण राठोडचा गर्भपात

दरम्यान, काल पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला होता. पूजा अरुण राठोड नावाच्या तरुणीचा यवतमाळच्या रुग्णालयात गर्भपात झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. त्यामुळे ही पूजा अरुण राठोड कोण? पूजा अरुण राठोड हिचा पूजा चव्हाणशी काय संबंध? पूजा अरुण राठोड हीच पूजा चव्हाण आहे का? कथित मंत्र्याने आपल्या जिल्ह्यातील रुग्णालयात हा गर्भपात घडवून आणलाय का? असे अनेक प्रश्न उपस्थित राहिले.
अहवालामध्ये काय?

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळचा हा रिपोर्ट आहे. या रिपोर्टवर इंग्रजीत ड्राफ्ट कॉपी असं लिहिलं असून त्या खाली शॉर्ट केस रेकॉर्ड असे लिहिले आहे. रिपोर्टवर प्रिंट ता. 17 फेब्रुवारी 2021 लिहिले आहे. वेळ दुपारी 1.47 वाजताची लिहिली आहे. तर सेव्हड तारीख 12 फेब्रुवारी 2021 लिहिली असून वेळ संध्याकाळ 7.29 वाजताची लिहिली आहे. तसेच 6 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 4 वाजून 34 मिनिटांनी रुग्णालयात भरती केल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. म्हणजे पूजा अरुण राठोड या तरुणीवर 6 फेब्रुवारी रोजी उपचार झाल्याचे स्पष्ट होत आहे. वॉर्ड नंबर 3 मध्ये या महिलेला अॅडमिट करण्यात आले असून युनिट नंबर 2 मध्ये ही तरुणी उपचार घेत असल्याचेही त्यावर नमूद करण्यात आले आहे. डिस्क्रिप्शनमध्ये कोणत्याही गुंतागुंतीशिवाय या महिलेचा गर्भपात करण्यात आल्याचेही त्यात स्पष्टपणे लिहिण्यात आले आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण काय?

मूळ परळीच्या पूजा चव्हाणचा पुण्यातील राहत्या घरातून पडून 7 फेब्रुवारीला मृत्यू झाला. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी ती भावासोबत पुण्यात राहात होती. तिने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आत्महत्येशी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरु झाली होती. भाजपने रितसर तक्रार दाखल केली. इतकेच नाही तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलिस आयुक्तांना पत्र लिहून, चौकशीची मागणी केली. इतके सगळे होत असताना, पूजा चव्हाण आणि कथित मंत्र्यांची ऑडिओ क्लिप समोर आली. एक-दोन नव्हे तर तब्बल 12 ऑडिओ क्लिपमुळे चक्रव्यूहात सापडलेले मंत्री संजय राठोड यांचे नावही उघड झाले.

पोस्टमार्टम अहवाल काय म्हणतो?

पोलिसांच्या पंचनाम्यानुसार पूजाने नैराश्येतून आत्महत्या केली आहे. तर पूजाच्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार तिच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची आकस्मिक मृत्यू, अशी नोंद करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी पंचनाम्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पूजाने आत्महत्या केल्याचे म्हटलेले नाही.

ऑडिओ क्लिपमधून उलगडा?

पूजा चव्हाणच्या आत्महत्येशी संबंधित काही ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या आहेत. त्या त्याच प्रकरणाशी संबंधित आहेत का, याचाही खुलासा किंवा माहिती ना पोलिसांनी दिली, ना पूजाच्या कुटुंबियांनी. पण त्यात एक व्यक्ती प्रकरण दाबण्यासाठी काही सूचना देत असल्याचे समजते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.