विधानपरिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान केंद्र सज्ज

राज्यात पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी आज (1 डिसेंबर) मतदान, 3 डिसेंबरला निकाल

0

मुंबई : राज्यातील विधानपरिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघासाठी आज (1 डिसेंबर) मतदान पार पडत आहे. औरंगाबाद, पुणे, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान होणार आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान पार पडेल. तर 3 डिसेंबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. कोरोनाच्या सावटाखाली या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली आहे.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ  : औरंगाबाद (मराठवाडा) पदवीधर मतदारसंघात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण आणि भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यामध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सतीश चव्हाण यांची ही सलग तिसरी निवडणूक आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपवासी झाल्यामुळे चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक तितकी सोपी राहिलेली नाही.
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान पार पडणार आहे. मराठवाडा पदवीधरसाठी मतदारसंघासाठी 3 लाख 74 हजार 45 मतदार मतदान करणार आहेत. एकूण 813 मतदान केंद्रावर मतदान पार पडणार आहे. यासाठी एकूण 35 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारात खरी लढत आहे.

पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ : विधानपरिषदेच्या पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी मतदान होत आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. मतदानासाठीचे सर्व कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहोचले आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी विभागात 4 लाख 32 हजार, तर शिक्षक मतदारसंघासाठी 74 हजार 860 इतके मतदार आहेत. तर पुणे विभागात मिळून एकूण 1 हजार 202 मतदान केंद्र आहेत. पदवीधर मतदारसंघासाठी एकूण 62 उमेदवार रिंगणात आहेत.
यामध्ये महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अरुण लाड, तर भाजपकडून संग्राम देशमुख निवडणूक लढवत आहेत. इतर प्रमुख पक्षांचे उमेदवारदेखील या रिंगणात उतरले आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेच्या एका जागेसाठी 62 उमेदवार तर शिक्षक मतदारसंघाच्या एका जागेसाठी 35 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत आसगावकर आणि भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार हे निवडणूक लढवत आहेत. दरम्यान या निवडणुकीची मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघ : नागपूर पदवीधर मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली आहे. या मतदान केंद्रात निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली आहे. नागपूर मतदारसंघात 322 मतदान केंद्रात मतदान पार पडत आहे. नागपूर मतदारसंघात एकूण 2 लाख 6 हजार 454 मतदार आहेत.  नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे संदीप जोशी आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यात सरळ लढत होत आहे. भाजपने विद्यमान आमदारांना डावलून महापौर संदीप जोशी यांना मैदानात उतरवले आहे. तर काँग्रेसकडूनही नव्या दमाच्या अभिजीत वंजारी यांना संधी देण्यात आली आहे.

अमरावती शिक्षक मतदारसंघ :  अमरावती शिक्षक मतदारसंघात वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती आणि बुलडाणा या जिल्ह्यांचा समावेश आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेकडून विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांना संधी देण्यात आली आहे. तर भाजपकडून नितीन धांडे निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान भाजप नेते अनिल बोंडे यांच्या बहीण संगिता शिंदेही मैदानात असल्याने भाजप उमेदवारासमोरिल डोकेदुखी वाढली आहे.

औरंगाबादमध्ये कोणाकोणात लढत? : शिरीष बोराळकर (भाजप) विरुद्ध प्रवीण घुगे (भाजप बंडखोर) विरुद्ध रमेश पोकळे (भाजप बंडखोर) विरुद्ध नागोराव पांचाळ (वंचित)

पुण्यात कोणाकोणात सामना? : संग्राम देशमुख (भाजप) विरुद्ध जयंत आसगावकर (काँग्रेस) विरुद्ध रुपाली पाटील ठोंबरे (मनसे) विरुद्ध अभिजीत बिचुकले विरुद्ध सोमनाथ साळुंखे (वंचित)

नागपुरातून रिंगणात कोण? : संदीप जोशी (भाजप) विरुद्ध अभिजित वंजारी (काँग्रेस) विरुद्ध राहुल वानखेडे (वंचित),

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.