HIT मारल्यानंतर किती मच्छर मेले हे मोजत बसू की आरामात झोपू? व्ही.के सिंह यांचा विरोधकांना प्रश्न
वायुदलाने केलेल्या हल्ल्यात ठार केलेल्या दहशतवाद्यांचे पुरावे मागणा-या विरोधकांना केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंह यांनी कठोर शब्दांत उत्तर दिले आहे.
बालाकोटमध्ये असलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या ठिकाणांवर वायुदलाने केलेल्या एअर स्ट्राईक वरून राजकारण सुरु झाले आहे. पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर विरोधी पक्षनेते ठार केलेल्या दहशतवाद्यांची संख्या आणि त्या ठिकाणांचे पूरावे मागत आहेत. दुसरीकडे सत्ताधारी भाजप सुरक्षा दलाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांवर करत आहे.
व्ही.के. सिंग म्हणाले होते, की सुमारे 250 दहशतवादी या हल्ल्यात मारले गेले आहेत. तसेच बुधवारी त्यांनी एक टि्वट करून सांगितले, ‘रात्री 3:30 वाजता खूप मच्छर होते. मी हिट मारून मच्छर मारले. आता मच्छर किती मारले हे मोजत बसू की आरामात झोप घेऊ?’
बालाकोटमध्ये भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारले गेले, याचा ठोस आकडा अद्याप समोर आलेला नाही. मात्र इंटेलिजेन्सीच्या रिपोर्टनुसार, घटनेवेळी जैश-ए-मोहम्मदच्या कॅम्पमध्ये सुमारे 300 मोबाईल फोन सुरु होते.
रात ३.३० बजे मच्छर बहुत थे,
तो मैंने HIT मारा।
अब मच्छर कितने मारे, ये गिनने बैठूँ,
या आराम से सो जाऊँ? #GenerallySaying
— Vijay Kumar Singh (@Gen_VKSingh) March 6, 2019