मुख्यमंत्र्याविरुद्ध औरंगाबाद पोलिसात तक्रार; देशदोहाचा गुन्हा दाखलची मागणी
वकील रत्नाकर भीमराव चौरे यांनी त्यांच्याविरुद्ध बेगमपुरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल
औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणानंतर राजकारण चांगलेच तापले आाहे. भाषणात त्यांनी भाजपातील अनेक नेत्यांवर सडकून टीका केली. त्यानंतर भाजपातील नेत्यांनीही पत्रकार परिषदा घेऊन मुख्यमंत्र्यावर टाका केली. माात्र आता उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील वाक्याने भावना दुखावल्याबद्दल औरंगाबाद येथील वकील रत्नाकर भीमराव चौरे यांनी त्यांच्याविरुद्ध बेगमपुरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणानंतर राजकारण चांगलेच तापले आाहे. भाषणात मुख्यमंत्र्यांनी भाजपातील अनेक नेत्यांवर सडकून टीका केली. त्यानंतर भाजपातील नेत्यांनीही पत्रकार परिषदा घेऊन मुख्यमंत्र्यांवर टीका केली. मात्र आता उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील वाक्याने भावना दुखावल्याबद्दल औरंगाबाद येथील वकील रत्नाकर भीमराव चौरे यांनी त्यांच्याविरुद्ध बेगमपुरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यामध्ये माझ्या भारत देशाची तुलना पाकिस्तान व बांगलादेश या दहशतवादी व मुस्लीम राष्ट्रांशी करून माझ्या भारत देशाचा अवमान केला आहे. माझी धार्मिक भावना भडकावली आहे. त्यामुळे भारत देशाचा एकअर्थी अवमान झालेला आहे. उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी लाचार होऊन हिंदुत्वाचा त्याग करून खुर्ची संपादन केलेली आहे. त्या संदर्भात मी याआधी सुद्धा आवाज उठवला आहे. तरी मुख्यमंत्र्यांनी भारताचा अपमान करून राष्ट्रीय व धार्मिक भावना दुखावल्या. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, असे वकील चौरे यांनी तक्रारीत म्हटले आहे. मुखयमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात खणखणीत भाषण करत भाजपवर जोोरदार टीकास्र सोडले होते. यावेळी त्यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशचा उल्लेख केला होता. त्यावरून वकील चौरे यांनी तक्रार दाखल करून मुखयमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.