मोदींनी हवाईदलाचे 30 हजार कोटींचे नुकसान केले, राहूल गांधींचा हल्लाबोल

0

राफेलवरून सुरु असलेले वादंग थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसत आहे. आता राफेलवरून पुन्हा काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी मोदींवर आरोप केला आहे. राफेल डीलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट हस्तक्षेप केला. अनिल अंबानी यांच्या कंपनीला राफेलचे कंत्राट मिळावे म्हणून त्यांनी समांतर वाटाघाटी केल्या, असाही गंभीर आरोप राहूल गांधींनी केला.

पंतप्रधान मोदींनी थेट फ्रान्सशी वाटाघाटी केल्याने संरक्षण मंत्रालयाकडून सुरु असलेल्या करारदरम्यान याचा फायदा फ्रान्सला मिळाला होता. या हस्तक्षेपाला संरक्षण मंत्रालयाने विरोधही केला होता. याच मीडिया रिपोर्टच्या आधारे काँग्रेसने पुन्हा मोदींवर निशाणा साधला. राहूल गांधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीलमध्ये थेट हस्तक्षेप केला होता.’ राहूल गांधी यांनी इंग्रजी वृत्तपत्र द हिंदूच्या वृत्ताचा आधार घेत मोदींवर हल्ला केला.

नरेंद्र मोदी यांनी भारतीय वायू सेनेचे 30 हजार कोटींचे नुकसान केले आहे. मोदींनी हवाईदलाचे 30 हजार कोटी लुटून अनिल अंबानींना दिले. आम्ही हा विषय मागील एक वर्षांपासून उपस्थित करत आहोत. आता संरक्षण मंत्रालयातील एका अधिका-यानुसार, पंतप्रधान कार्यालय फ्रान्स सरकारशी थेट वाटाघाटी करत होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.