पंतप्रधान मोदींचा गांगुलीच्या पत्नीला फोन, प्रकृतीची विचारपूस, लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा
अनेक चाहते तसेच क्रिकेटपटूंनी ट्विट करत गांगुलीच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याच्या प्रकृतीची फोन करून विचारपूस केली. मोदींनी गांगुलीची पत्नी डोना गांगुलीला फोन करुन दादाच्या प्रकृतीची माहिती घेतली तसेच लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मोदींनी सौरवशीही संवाद साधला.
सीपीएम नेते सीताराम येचुरी यांनीही रुग्णालयात जाऊन सौरवशी भेट घेतली. तत्पूर्वी त्याअगोदर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल जगदीप धनकर यांनीही रुग्णालयात जाऊन गांगुलीची भेट घेतली. गांगुलीला 2 तारखेला ह्रदयविकाराचा झटका आला. गांगुलीला उपचारांसाठी कोलकातामधील वुडलॅंड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार सौरव गांगुलीची प्रकृती स्थिर आहे. गांगुलीला जीममध्ये वर्कआऊट करताना त्रास जाणवू लागला. यानंतर गांगुलीने वुडलॅंड्स रुग्णालयात तपासणी करुन घेतली. तपासणीत छातीत गंभीर त्रास असल्याचे निदान झाले. यानंतर रुग्णालयाकडून गांगुलीवर अँजियोप्लास्टी सर्जरी आली. डॉक्टर सरोज मंडल तसेच इतर 3 डॉक्टरांनी गांगुलीवर अँजियोप्लास्टी केली. गांगुली लवकरात लवकर बरा व्हावा, यासाठी अनेक चाहते प्रार्थना करत आहेत. तसेच अनेक क्रिकेटपटूंनी ट्विट करत गांगुलीच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली आहे. वीरेंद्र सेहवाग, बीसीसीआय अध्यक्ष जय शाह यांनी ट्विटद्वारे गांगुलीच्या प्रकृतीत सुधार व्हावा, यासाठी प्रार्थना केली आहे.
गांगुली गेल्या काही महिन्यांपासून कोलकातामध्येच आहे. गांगुलीने काही दिवसांआधी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांची भेट घेतली होती. यानंतर गांगुलीने गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. भाजपशी वाढती जवळीक पाहून मुख्ममंत्री ममता बॅनर्जी यांनी गांगुलीला दिलेला भूखंड परत घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे गांगुलीला सौम्य झटका आला का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.