वाळूज महानगरातील ‘सम्यक गार्डेनिया’ सोसायटीमध्ये वृक्षारोपण
नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आनंदोत्सव साजरा
औरंगाबाद : वाळूज महानगरातील सम्यक गार्डेनिया सोसायटीत अयोध्या येथील रामजन्मभूमी भूमिपूजन समारंभाच्या निमित्ताने 5 ऑगस्ट रोजी वृक्षारोपण केले.मिठाईचे वाटप केले.या कार्यक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आनंदोत्सव साजरा केला.
अयोध्या येथील रामजन्मभूमी भूमिपूजन समारंभाच्या निमित्ताने 5 ऑगस्ट रोजी वृक्षारोपण केले.मिठाईचे वाटप केले.या कार्यक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आनंदोत्सव साजरा केला. यावेळी लहान-मोठी, अशी तब्बल 50 रोपे लावण्यात आली. या दरम्यान सामाजिक बांधिलकी जपत व सोशल डिस्टंन्स पाळत वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते नरेंद्रसिंह यादव, चंद्रकांत चोरडिया, उद्योजक सुनील भराटे, राजेंद्र कासलीवाल, दिलीप डेरे, भाऊसाहेब बारसे, विलास गँगवाल, ऋषी भराटे, बालाजी भराटे यांच्यासह अनेक नागरिकांची उपस्थिती होती.