‘जनसहयोग संस्थे’च्या वतीने छावणी परिषद डम्पिंग ग्राउंड येथे वृक्षारोपण

'झाडे लावा झाडे जगवा'याअंतर्गत पर्यावरण बचाव संदेश

0

औरंगाबाद : ‘जनसहयोग संस्थे’च्या वतीने छावणी परिषद डम्पिंग ग्राउंड येथे जनसहयोग संस्थेचे तनिष्क कासार, अक्षय गोडबोले यांच्यासह  आदींनी 1 हजारहून अधिक रोपे लावली.

‘जनसहयोग संस्थे’च्या वतीने छावणी परिषद डम्पिंग ग्राउंड येथे जनसहयोग संस्थेचे तनिष्क कासार, अक्षय गोडबोले यांच्यासह  ता.9 आँगस्ट रोजी 1 हजारहून अधिक रोपे लावण्यात आली. यात दुर्मिळ अशी कौशी, पाडळ, आसन, वारस, काळा उंबर, कांडोळ, रोहितक, बुचपांगारा, मेढशिंगी, टेंटु, पिवळा कांचन, कबीर वड आणि इतर प्रजातीचा समावेश होता. तर जंगली बदाम, किन्हई, पुत्रंजिवा, अजाण, हिरडा, मोह, वाव्हळ, खैर, शिवण, आपटा, पळस, बेहडा, बिब्बा, पिंपळ, उंबर, जांभूळ, अर्जुन, काटेसावर, भोकर, पिप्री, चिंच, कवठ, वाव्हळ, आपटा, जांभूळ, तामण आदीं रोपे लावली. या अगोदर या ठिकाणी 28 जुलै 2018  पासून सतत  13 हजारहून अधिक झाडे लावली. यावेळी 50 हुन अधिक लोकांनी सहभाग नोंदवून  वृक्षारोपण यशस्वी केले. यात जनसहयोग संस्थेचे तनिष्क कासार, अक्षय गोडबोले, अमोल मोरे, सय्यद फुरखान,  किशोरजी कासार,  संतोष दंडिमे, पवन दरक,  संदीप जगधने यांच्यासह अनेकांचा सहभाग असल्याचे प्रशांत गिरे यांनी सांगितले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.