प्रचारफलकावरून सुशीलकुमार शिंदेंचा फोटो गायब; ‘महाविकास’च्या बैठकीत काँग्रेसचा राडा

विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदरासंघात उमेदवाराच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची बैठक

0

सोलापूर : विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी सोलापुरात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आज राडा झाला. प्रचाराच्या बॅनर्सवर ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचा फोटो नसल्याने शिंदे समर्थक कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या. राज्याचे राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीतच या कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा देत गोंधळ घातला. त्यामुळे काही काळ तणवाचे वातावरण निर्माण झाले होते.

राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. राज्यमंत्री सतेज पाटीलदेखील महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रचार करत आहेत. यावेळी पुणे मतदार संघातून महाविकास आघाडीचे पदवीधरच्या जागेसाठी अरुण लाड आणि शिक्षक मतदारसंघासाठी जयंत आसगावकर निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यांच्या प्रचारार्थ सतेज पटील सोलापूरमध्ये आले होते. त्यांनी महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत लावण्यात आलेल्या  बॅनरमध्ये सुशिलकुमार यांचा फोटो नसल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.

बैठकीत ”सुशीलकुमार शिंदे तुम आगे बढो”चे नारे

बैठकीत लावलेल्या बॅनरवर काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचा फोटो नसल्यामुळे काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी बैठक रोखली. त्यांनी जोरदार नारेबाजी केली. बैठकीत त्यांनी सुशिलकुमार शिंदे आगे बढो असे नारे दिले. दरम्यान, या घोषणांमुळे बैठकीत पुरता गोंधळ उडाला. मंत्री सतेज पाटील यांनी वारंवार आवाहन करुनही काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाद न दिल्यामुळे बैठकीतील गोंधळ वाढतच गेला. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर बैठकीत गोंधळ उडाला. सतेज पाटील यांनी कार्यकर्त्यांना शांत बसण्याचे आवाहन केले. मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाद न दिल्याने शेवटी सतेज पाटील त्यांच्यावर भडकले. “बैठक चालू ठेवायची की नाही ? तुम्ही असाच गोंधळ घालत असाल तर मी निघून जाऊ का? असा सवालही त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी सुशिलकुमार शिंदे यांचा फोटो बॅनरवर न लावल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मात्र, यावेळीदेखील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.

काँग्रेस कार्यकर्त्यांचा बैठकीवर बहिष्कार

उमेश पाटील आणि सतेज पाटील यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुशिलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांचे बॅनरवर फोटो न लावल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर झाली नाही. त्यांनी बैठकीवर बहिष्कार घातला. यावेळी फोटो न लावणे हा काँग्रेसचा आपमान असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार जाणीवपूर्वक केल्याचा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला.

महाविकास आघाडी म्हणजे गोंधळात गोंधळ

यावेळी महाविकास आघाडीच्या बैठकीत झालेल्या या राड्याची राजकीय गोटात चांगलीच चर्चा रंगली आहे. या गोंधळाची दखल घेत विरोधकांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. महाविकास आघाडी म्हणजे गोंधळात गोंधळ आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. “तीन पक्षांमध्ये झालेली ही नैसर्गिक आघाडी नाही. हे नैसर्गिक मित्र नसल्याने यांच्यात गोंधळ उडत राहणार. महाविकास आघाडीचे हे सरकार म्हणजे गोंधळात गोंधळ आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.