सिडको प्रशासन विरोधात जनआंदोलन – ‘वाळूज महानगर बचाव समिती’चा इशारा

सिडको वाळूज महानगर बचाव कृती समितीचे सिडकाेला निवेदन

0

औरंगाबाद  : सिडको, संचालक मंडळ यांनी सिडको वाळूज महानगर प्रकल्प रद्द करण्याचा ठराव घेऊन महाराष्ट्र शासनाकडे पाठविण्यात आला. त्यानंतर सिडको वाळूजमहानगर परिसरातील देखभाल दुरुस्ती व विकासकामे तसेच ले -आऊट मंजुरीची कामे पूर्णपणे बंद झाली. यामुळे परिसरातील नागरिकांना आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. किंबहुना सिडकोचे सुध्दा नुकसान होत आहे.  याबाबत सिडको वाळूज महानगर बचाव कृती समितीने सिडकाेला निवेदन दिले.

सिडको, संचालक मंडळ यांनी सिडको वाळूज महानगर प्रकल्प रद्दचा ठराव घेऊन महाराष्ट्र शासनाकडे पाठविला. त्यानंतर सिडको वाळूजमहानगर परिसरातील देखभाल दुरुस्ती व विकासकामे तसेच ले -आऊट मंजुरीची कामे पूर्णपणे बंद झाली. यामुळे परिसरातील नागरिकांना आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. एवढेच नव्हे तर सिडकोचे सुध्दा नुकसान होत आहे.  परंतू अद्यापपर्यंत सिडकाेने यासाठी कोणतीही कार्यवाही केली नाही किंवा परिसरातील कामास सुरुवात झाली नाही तर सिडको प्रशासनाच्या विरोधात जन आंदोलन करणार असल्याचा इशारा सिडको वाळूज महानगर बचाव कृती समितीने दिला आहे.  त्यांनी सिडकाे प्रशासक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, स्थानिक नागरिकांच्या वतीने एक समिती स्थापन करून या समितीच्या माध्यमातून आपणास 21 सप्टेंबर ला आपल्या कार्यालयात प्रत्यक्षात भेट घेऊन आपणांस निवेदन सादर केले. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकारी सिडको वाळूज महानगर बचाव समितीचे पदाधिकारी यांच्यासह उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तसेच पालक मंत्री यांची भेट घेऊन सिडको वाळूज महानगर परिसरातील हजारो नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन शासन तसेच प्रशासनाकडे सादर केले आहे. आपणासही निवेदन दिलेले आहे. मात्र अद्यापपर्यंत आपल्याकडून या कोणत्याही  प्रकारची प्रतिक्रिया आली नाही किंवा परिसरातील कामे सुरु झाली नाही.  त्यामुळे  आम्ही आपणास विनंती करतो की , 15 दिवसांच्या आत आपण यावर निर्णय घ्यावा; अन्यथा सिडको वाळूजमहानगर नागरिक तसेच सिडको वाळूज महानगर बचाव कृती समितीच्या माध्यमातून सिडको प्रशासनाच्या विरोधात हे जन आंदोलन करण्यात येईल. यास सर्वस्व सिडको प्रशासन जबाबदार असेल असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर अध्यक्ष नागेश कुठारे, उपाध्यक्ष नरेंद्र यादव, शीतल गंगवाल , राजेश दरंदले, मच्छिद्रनाथ कुंभार, काकासाहेब बुट्टे, सुदाम जाधव,चंद्रकांत चोरडिया, नारायण पवार, पंडित शिंदे आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.