परतूरच्या शेतकऱ्याचे तेरा दिवसांपासून लाक्षणिक उपोषण, प्रशासनाचा कानाडोळा

सामाजिक कार्यकर्ते शिवाजी सवने यांच्या उपोषणचा 13 वा दिवस, ग्रामगीतेचे वाचन

0

परतूर  : मराठवाड्यासह जालना जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्याच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. यातून सावरण्याकरिता केंद्र शासनाने संपूर्ण मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी परतूर येथील शिवाजी सवने यांनी २२ ऑक्टोबरपासून लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.

मराठवाड्यासह जालना जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्याच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. यातून सावरण्याकरिता केंद्र शासनाने संपूर्ण मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी परतूर येथील शिवाजी सवने यांनी २२ ऑक्टोबरपासून लाक्षणिक उपोषण सुरू केले विशेष म्हणजे कुठल्याही शासकीय कार्यात अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी त्यांनी हे उपोषण आपल्या राहत्या घरीच सुरू केले. लाक्षणिक उपोषण करताना सवने यांनी संत तुकडोजी महाराजांच्या ‘ग्रामगीते’चे वाचन सुरू केले आहे. तेरा दिवसांपासून हे लाक्षणिक उपोषण सुरू असताना प्रशासनाने मात्र याकडे कानाडोळा केला आहे. एकही अधिकारी या ठिकाणी भेटीसाठी गेला नाही. दहाव्या दिवशी महसूल प्रशासनाने एका मंडळ अधिकाऱ्याला चार पानाचे पत्र घेऊन पाठवले आणि उपोषण सोडण्याची विनंती केली. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आपण नेमकी कोणती कार्यवाही केली याची अधिकृत माहिती आपल्याला द्या, कागदी घोडे नको, म्हणत सवने यांनी आपला उपोषणाचा निर्णय कायम ठेवला आहे. या उलट आपली मागणी पूर्ण होत नसेल तर प्रशासनाने आत्महत्येची परवानगी द्यावी, अशी मागणीही केल्याने खळबळ उडाली आहे. अतिवृष्टीमुळे आमच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन आपण पाहणी केली आहे. शेतकऱ्यांना यातून सावरण्यासाठी तातडीची आर्थिक मदत गरजेची आहे. याच मागणीसाठी मी हे लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. माझ्या उपोषणाची दखल घेत नाही तर, माझ्या आत्महत्येनंतर प्रशासन याची दखल घेणार का?  असे शिवाजी सवने म्हणाले, उपोषणकर्ते शिवाजी सवने यांनी तहसीलदार भाऊसाहेब जाधव, उपविभागीय अधिकारी, परतूर  यांना पत्र पाठवले आहे. तहसीलदारांमार्फत मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी पाठवले. शेतकऱ्यांना मदत मिळण्याच्या उद्देशातून योग्य ती कार्यवाही पूर्ण करून वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल पाठवण्यात आला आहे. याबाबतची माहिती सवने यांना पत्राद्वारे कळवली. यापेक्षा अजून आम्ही काय करू शकतो?

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.