परीट धोबी युवक समाजबांधवांचा पुढाकार, दुर्बल कुटुंबास आर्थिक मदतीचा हात

महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळ व युवक मंडळाच्या आव्हानाला भरभरून प्रतिसाद

0

पैठण   : पैठण तालुक्यातील थेरगाव येथील कै.विठ्ठल कोडीबा जाधव याचे 18 दिवसांपूर्वी लाईटचे काम करत असताना विजेचा शॉक लागल्याने उपचार सुरू असताना काही दिवसांपूर्वी त्याचे निधन झाले. कुटुंबावर मोलमजूरी  करून दैनंदिन आपला उदरनिर्वाह करत असे. त्यांच्या पश्चात पत्नी छायाताई विठ्ठल जाधव व त्यांना तीन मुली आहेत.  ते कुटुंब  आर्थिकदृष्ट्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आहेत. स्वत:चे घर, शेती नाही. दुसरे कोणतेही रोजगाराचे साधन नसून. आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. आम्ही परीट धोबी सेवा मंडळ समाजबांधव  शासनाला विनंती करतो की, आपणही या परिवारास आर्थिक मदत जाहीर  करून सहकार्य करावे.

आज महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळ व युवक मंडळाच्यावतीने केलेल्या आव्हानाला महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद मिळाला. आज त्यांना औरंगाबाद पैठण येथील पदाधिकारी यांनी थेरगाव येथे भेट देऊन त्यांना रोख ( एकतीस हजार) 31.000 रुपये व किराणा मुलींना व ताईंना कपडे व  प्राजक्ताताई गणेश भवर यांच्याकडून एक शिलाई मशीन व समाजबांधव  अनिल मोरे सर यांच्याकडून ‘सुकन्या’ योजनेमध्ये एका मुलीचे प्रतिवर्ष 2400 रुपये भरण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली व महाराष्ट्रातील अनेक बांधवांनी रोख स्वरूपात त्यांना मदत केली असून या सर्वांची टोटल रक्कम मिळून आज  छायाताई जाधव यांना (एकतीस हजार रुपये) 31.000 चेक स्वरूपामध्ये हे एफ डी करण्यासाठी दिले .  पैठण शहराच्या वतीने किराणा साहित्य व गणेशराव ढोबळे साहेब याच्या वतीने तिन्ही मुलीना ताईना कपडे दिले. आज जिल्ह्यातील पदाधिकारी मराठवाडा सचिव साईनाथ हजारे युवा जिल्हाध्यक्ष गणेशराव मढीकर कार्याध्यक्ष आप्पासाहेब ठोंबरे राजश्री शाहू बँकेचे व्यवस्थापक कृष्णाभाऊ साळवे, दादासाहेब भुमरे लॉन्ड्री संघटनेचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब धोंगडे सचिव राजू काशीद युवा तालुकाध्यक्ष अरुण धोंगडे सचिव गणेश राक्षे शहराध्यक्ष शिवाजीराव तरटे शिवाजी मुळे नितीन बर्वे ज्ञानेश्वर तरटे शहराध्यक्ष रुपेश लोंधे हरी ढोबळे गणेश मोरे ऊपस्थित होते. आपल्या माता भगिनी याना सर्वांच्या मदतीची गरज आहे .आज महाराष्ट्र राज्य परीट धोबी युवक मंडळ औरंगाबाद व पैठण येथील पदाधिकारी थेरगाव यथे उपस्थित होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.