सर्वच कार्यकर्ते जवळचे, बळासाठी औरंगाबादेत, बोराळकरांचा अर्ज भरताना पंकजांची प्रतिक्रिया

पंकजा समर्थक प्रवीण घुगे यांनी भाजपसोबत बंडखोरी, उमेदवारी अर्ज दाखल

0

औरंगाबाद : मी नाराज असल्याच्या चर्चा व्यर्थ आहेत. सगळेच माझ्या जवळचे कार्यकर्ते आहेत. मी सगळे बळ लावण्यासाठी येथे आले आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली. विधानपरिषदेवरील औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून शिरीष बोराळकर यांनी अर्ज भरला.

विधानपरिषदेवरील औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून शिरीष बोराळकर यांनी अर्ज भरला. यावेळी पंकजा मुंडे आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते. मराठवाडा औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पंकजा मुंडेंच्या समर्थकाने बंडाचे निशाण फडकवल्यानंतर पंकजा मुंडे बोलत होत्या. “मी नाराज नाही, सगळ्या चर्चा व्यर्थ आहेत. सगळे माझ्या जवळचे कार्यकर्ते आहेत. सगळीकडे निवडणूक होत आहे. मी सगळे बळ लावण्यासाठी येथे आले आहे” असं पंकजांनी  सांगितले. पंकजा मुंडे यांचे समर्थक प्रवीण घुगे यांनी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून भाजपसोबत बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. औरंगाबादमधून शिरीष बोराळकर यांना पक्षाने अधिकृतरित्या तिकीट दिले आहे. तर बीडचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनीही बंडाचे निशाण फडकवत अर्ज भरला. पोकळे यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा सोबत घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर जयसिंगराव गायकवाड यांनीही बंडखोरी करत अर्ज भरला. मराठवाड्यातील तीन मोठ्या उमेदवारांनी बंडखोरी केल्याने भाजपला जबर हादरा बसल्याचे बोलले जाते.

“त्या बैठकीला उपस्थितीची आवश्यकता नव्हती”

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जी बैठक घेतली त्यात माझ्या उपस्थितीची आवश्यकता नव्हती, असे स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिलं. चंद्रकांत पाटील बीड जिल्ह्यात आलेले असताना त्यांच्या दौऱ्याकडे पंकजा मुंडे यांनी पाठ फिरवल्यामुळे त्या नाराज असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. त्यावर पंकजा मुंडे यांनी ट्विट करत आपण मराठवाडयातील बैठकांना उपस्थित राहू शकत नाही, असे याआधीच सांगितल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान, ऊसतोड कामगार फक्त भाजपचे नाहीत, राष्ट्रीवादीचे आणि काँग्रेसचेही आहेत. ऊसतोड कामगारांची सेवा भाजप आमदार सुरेश धस करत असतील तर त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांच्या मतदारसंघात 40 50 हजार ऊसतोड कामगार आहेत, त्यांची सेवा त्यांनी केली पाहिजे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. ऊसतोड मजुरांच्या प्रश्नी पंकजा आणि धस आमने-सामने आले होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.