पंकजा मुंडे यांचे पद्धतशीरपणे पंख छाटण्याचे काम सुरू; राजकीय वर्तुळात चर्चा

आज जालन्यात जिल्हा पदाधिकाऱ्यांची चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक

0

औरंगाबाद : पंकजा मुंडे यांना पक्षात अजूनही डावलले जात असल्यामुळे मराठवाड्यातील पक्षबांधणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकांना त्या उपस्थित राहत नसल्याचा दावा भाजप नेत्यांकडून फेटाळला आहे. पंकजा मुंडे  वैयक्तिक कारणांमुळे या बैठकांना उपस्थित राहिल्या नाहीत, अशी सारवासारव भाजपच्या नेत्यांकडून सोमवारी करण्यात आली. मात्र, त्याचवेळी औरंगाबादमधील बैठकीला पंकजा मुंडे समर्थकांनी दांडी मारल्याने भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा आहे.

जालन्यात  आज चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत  जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. या बैठकीला माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मेघना बोर्डीकर आणि भागवतराव कराड हे नेतेदेखील उपस्थित आहेत. मात्र, पंकजा समर्थक नेत्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. याविषयी विचारणा केली असता, मेघना बोर्डीकर यांनी पंकजा मुंडे नाराज असल्याचे वृत्त फेटाळून लावले. पंकजाताई त्यांचे महत्वाचे काम आल्यामुळे दिल्लीत गेल्या आहेत. त्यामुळे त्या आजच्या बैठकीला उपस्थित राहू शकल्या नसल्याचे मेघना बोर्डीकर  म्हणाले. तर भाजप नेते भागवतराव कराड यांनीही पंकजा मुंडे नाराज नसल्याचे स्पष्ट केले. पंकजा मुंडे यांची वैयक्तिक अडचण असल्यामुळे त्या बैठकीला आलेल्या नाहीत. कुठलीही नाराजी नाही. बाकी मला याबाबत काहीही माहिती नाही. पंकजा मुंडे नसल्या तरी प्रीतम मुंडे पंकजा मुंडे यांना पक्षात अजूनही डावलले जात असल्यामुळे मराठवाड्यातील पक्षबांधणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकांना त्या उपस्थित राहत नसल्याचा दावा भाजप नेत्यांकडून फेटाळला आहे. पंकजा मुंडे  वैयक्तिक कारणांमुळे या बैठकांना उपस्थित राहिल्या नाहीत, अशी सारवासारव भाजपच्या नेत्यांकडून सोमवारी करण्यात आली. मात्र, त्याचवेळी औरंगाबादमधील बैठकीला पंकजा मुंडे समर्थकांनी दांडी मारल्याने भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा आहे. या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे भागवतराव कराड यांनी सांगितले.

भाजपमध्ये पंकजा मुंडे दुर्लक्षितच
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपने पंकजा मुंडे  यांना राष्ट्रीय सचिवपद देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले होते. मात्र, हे राजकीय पुनर्वसन केवळ तोंडदेखलेच आहे की काय, अशी शंका आता येत आहे. कारण, भाजपमधील काही नेत्यांकडून अजूनही पंकजा मुंडे यांचे पद्धतशीरपणे पंख छाटण्याचे काम सुरुच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मुळात राष्ट्रीय सचिवपद मिळाल्यानंतर पंकजा मुंडे यांचे महाराष्ट्रातील राजकीय वजन वाढायला हवे होते. पण राज्य तर सोडाच मराठवाड्यातही पंकजा मुंडे यांना पक्षबांधणीच्या कार्यक्रमापासून दूर ठेवले जात आहे. सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पक्षबांधणीसाठी मराठावाड्यात सक्रिय झाले आहेत. ते एकटेच मराठवाड्यात बैठका घेत आहेत. परंतु, मराठवाड्यात पंकजा मुंडे यांची मोठी राजकीय ताकद असताना त्यांना पक्षबांधणीच्या कार्यक्रमापासून दूर का ठेवले जात आहे, अशी शंका निर्माण झाली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.