पंकजा मुंडे म्हणाल्या : शरद पवार साहेब, तुमचे कार्य आणि कामगिरीला सलाम !

रोहित पवार कौतुक करत म्हणाले, 'आपल्याकडून इतरांनी मनाचा मोठेपणा जरूर शिकावा'!

0

मुंबई : राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे गेल्या काही दिवसांपासून सतत दौऱ्यांवर आहेत. तसेच त्यांच्या अनेक बैठकाही घेणे सुरूच आहे. मंगळवारीही राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांविषयी पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बैठक पार पडली. यावरुन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शरद पवार यांना सॅल्यूट केला.

मंगळवारीही राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांविषयी पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बैठक पार पडली. यावरुन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शरद पवार यांना सॅल्यूट केला. यानंतर आमदार रोहित पवारांनी पंकजा मुंडेंचे तोंडभरुन कौतुक केले आहे. पंकजा मुंडे यांनी शरद पवारांना सलाम करत ट्विट केले की, ‘हॅट्स ऑफ शरद पवार साहेब…कोरोनाच्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले… पक्ष, विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तर कष्ट करणाऱ्याविषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबानी शिकवले आहे’ असे म्हणत पंकजा मुंडेंनी शरद पवारांना सलाम ठोकला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.