भांबर्डात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून अभिवादन

0

भांबर्डा  : औरंगाबाद तालुक्यातील भांबर्डा येथील ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, राजमाता ग्रुप,श्रीकृष्ण मल्टीसव्हिसेस यांच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करून अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
भांबर्डा येथील ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, राजमाता ग्रुप, श्रीकृष्ण मल्टीसव्हिसेस यांच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमांचे पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन मंगळवार दि.१२ जानेवारी रोजी करण्यात आले. यावेळी माजी सरपंच भीमराव साळुंके, शालेय समिती अध्यक्ष भीमराव पठाडे, ग्रामसेवक अनिल केंद्रेकर, मुख्यध्यापक राजेंद्र वाघमारे, शिक्षक जीवन साळुंके, समाजसेवक सोमनाथ जाधव, ग्रामपंचायत सदस्य संतोष फुकटे, सजन शिंदे, शिवाजी दिवटे, राजेंद्र काळे, तसेच संतोष दिवटे, रामलाल साळुंके, रामदास काकडे, संजय दौंड,बाबासाहेब फुकटे, तेजराव शिंदे, लहू गंगावणे, राजमाता ग्रुप प्रमुख विजय शिंदे, गणपत गंगावणे, मच्छिंद्र दिवटे, राजू शिंदे, बाबा शिंदे, राजेंद्र पठाडे, प्रल्हाद साळुंके, राधाकिसन दिवटे, बबन साळुंके, भिमराव काळे, शिवाजी फुकटे, भरत पठाडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.