वाळूज महानगर परिसरातील ग्रामपंचायती मनपात समावेश करण्यास विरोध, कायदेशीर लढ्यासाठी एकवटल्या ग्रामपंचायती

परिसरातील ग्रामपंचातीचा मनपा हद्दीत समावेश करण्याच्या प्रशासनाकडून हालचाली सुरू

0

औरंगाबाद : वाळूज महानगर  परिसरातील ग्रामपंचातीचा मनपा हद्दीत समावेश करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू करण्यात आल्या आहेत. मनपात या परिसरातील ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात येऊ नये , याकरिता कायदेशीर लढा देणार असल्याचे ग्रामपंचायतील आजी- माजी पदधिकारी यांनी म्हटले आहे.यासाठी बजाजनगर येथे ता.२६ फेब्रुवारी रोजी आजी- माजी पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

वाळूज महानगर परिसरातील तिसगाव, पंढरपूर, वळदगाव, पाटोदा, रांजणगाव, वडगाव बजाजनगर, गोलवाडी, वाळूज आदी ग्रामपंचायतीचा मनपा हद्दीत समावेश करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू करण्यात आल्या आहेत.वाळुज भागातील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना या प्रकारची कुठलीही माहिती न देता हा निर्णय घेण्यात येत आहे.या संदर्भात परिसरातील ग्रामपंचायतीच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी लढा उभारण्याची तयारी सुरु केली आहे.बजाजनगर येथे परिसरातील ग्रामपंचातीच्या आजी -माजी पदाधिकाऱ्यांच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन वाळूज परिसरातील ग्रामपंचायतीचा मनपात समावेश करण्यात येऊ नये, यासाठी सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करून कायदेशीर मार्गाने लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मनपाला विरोध करण्यासाठी परिसरातील ग्रामपंचायतीमध्ये ठराव पारित करून हा ठराव प्रशासनाकडे सादर केला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला माजी जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र कसुरे , वडगाव बजाजनगरचे सरपंच सचिन गरड पाटील, पंढरपूरचे माजी सरपंच शेख अख्तर,वाळूजच्या सरपंच सईदाबी पठाण , वळदगावचे माजी सरपंच कांतराव नवले, उपसरपंच संजय झळके,तिसगावचे उपसरपंच नागेश कुठारे,पाटोदा येथील उपसरपंच कपींद्र पेरे, बाबासाहेब धोंडरे,रोहित राऊत,महेंद्र खोतकर, कैलास हिवाळे,महेबूब चौधरी,गणेश बिरंगळ, काकासाहेब बुट्टे,राजेश कसुरे,संजय जाधव,सुनील काळे,आदींसह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.