‘ओएऩजीसी’ गॅस प्रकल्पात भीषण आग, स्फोटांचे आवाज सुरूच

गॅस पाईपलाईनच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती

0

सूरत : गुजरात येथे  ओएऩजीसी गॅस प्रकल्पातून  बुधवारी मध्यरात्र उलटून गेल्यानंतर सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास सूरत येथे असणाऱ्या ‘ओएऩजीसी’ गॅस प्लांटमध्ये भीषण आग लागली आहे. आगीचे स्वरुप पाहता, सध्याही त्या ठिकाणी स्फोटांचे आवाज येत आहेत. त्यामुळे जवळपासच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनाही सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे.

ओएऩजीसी गॅस प्रकल्पातून  बुधवारी मध्यरात्र उलटून गेल्यानंतर सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास सूरत येथे असणाऱ्या ‘ओएऩजीसी’ गॅस प्लांटमध्ये भीषण आग लागली आहे. आगीचे स्वरुप पाहता, सध्याही त्या ठिकाणी स्फोटांचे आवाज येत आहेत. त्यामुळे जवळपासच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनाही सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. गॅस पाईपलाईनच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती हाती आली असून,  यासंबंधीचा एक व्हिडिओसुद्धा प्रसिद्ध केला आहे. जो पाहता आगीचे मूळ स्वरुप लक्षात येत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू असून यात काही अंशी यश मिळाल्याचे समजते आहे. ‘ओएनजीसी’ गॅस प्रकल्पात झालेल्या स्फोटाचं स्वरुप अतिशय भीषण होतं. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार घटनास्थळानजीक असणाऱ्या गावांमधील घरांच्या खिडक्यांनाही यामुळं हादरा बसल्याचे जाणवले. दरम्यान, या दुर्घटनेमध्ये अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. सूरतच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गॅस प्रकल्पामध्ये लागलेली आग ही ‘ऑन साईट एमरजन्सी’ या स्वरुपातील आहे. परिणामी ‘ऑफ साईट एमरसन्सी’ नसल्यामुळे नजीकच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. एखाद्या प्रकल्पापुरताच जेव्हा समस्या सीमित असते तेव्हा ती  ‘ऑन साईट एमरजन्सी’ म्हणून संबोधली जाते. तर, हीच स्थिती नियंत्रणाबाहेर जाऊन समस्या निर्माण करते तेव्हा या परिस्थितीकडे  ‘ऑफ साईट एमरजन्सी’ म्हणून पाहिले जाते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.