लॉकडाऊनमुळे जेवणाचे पाकीट वाटप; पुरीसाठी मजुराची हत्या, एक जण गंभीर जखमी

मजुरांनी त्याची टिंगलटवाळी उडवत म्हटले भिकारी

0

नागपूर : नागपुरात अवघ्या एका पुरीसाठी एका मजुराची हत्या झाली, तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला . लकडगंज पोलिस स्टेशनअंतर्गत आज पहाटे साडे तीनच्या सुमारास ही घटना घडली.

लकडगंज परिसरात मेहता पेट्रोल पंपाजवळ काल रात्री एका संस्थेकडून लॉकडाऊनमुळे परिसरातील मजूर आणि रस्त्यावर राहणाऱ्या बेघरांना जेवणाचे पाकीट वाटले होते. त्यावेळी विनोद मोखे नावाच्या सिक्युरिटी गार्डला मिळालेल्या जेवणाच्या पाकिटात पुरी नव्हती. तेव्हा विनोदने ही बाब सहकारी मजुरांना सांगितली. लालचंद मेंढे आणि कंडक्टर नावाच्या दोन मजुरांनी त्याची टिंगल उडवत त्याला भिकारी म्हणाले आणि आपल्या पाकीटामधील पुरी विनोदला खायला दिली. लालचंद आणि कंडक्टर यांनी आपला अपमान केला. या रागातून विनोद मोखे याने रात्री अडीचच्या सुमारास  झोपलेल्या लालचंद आणि कंडक्टर या दोघांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करत लालचंदची हत्या केली. तर कंडक्टरला जबर जखमी केले. त्यानंतर आरोपी विनोदने लकडगंज पोलिस स्टेशन गाठून स्वतः ला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी आरोपी विनोद मोखेला अटक केली असून दारुच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याचे सांगितले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.