एक दिवसाची आमदार सविता पानकर यांचे निधन; स्वप्न लाल दिव्याच्या गाडीचे…

'महिला दिनी' एक दिवसाची आमदार सविताचा कर्करोगाने उपचारादरम्यान मृत्यू

0

बुलडाणा :एक दिवसाच्या आमदार सविता पानकरचे निधन झाले. सविताच्या मृत्यूने तिचे लाल दिव्याच्या गाडीचे स्वप्न अधुरेच राहिले आहे. सविता कर्करोगाने ग्रस्त होती. अखेर तिची कर्करोगाशी झुंज अयशस्वी ठरली. उच्च शिक्षण घेऊन आपल्या प्रबळ पंखांनी भरारी घेऊन जनतेची सेवा करण्याची सविता पानकर या तरुणीची इच्छा अपूर्णच राहिली. महिला दिनी एक दिवसाची आमदार झालेल्या सविताचा कर्करोगाने उपचारादरम्यान मृत्यू झाला.. त्यामुळे या तरुणीचे उंच शिखर गाठून लाल दिव्याच्या गाडीचे स्वप्न अधुरेच राहिले.

बुलडाणा शहरात राहणाऱ्या सविताच्या कुटुंबाची अत्यंत हालाखीची परिस्थिती आहे. लहान असतानाच तिच्या आईचा मृत्यू झाल्याने वडील-आजोबांनी मोलमजुरी करुन तिचे पालनपोषण केले. सविताने मोठ्या जिद्दीने अभ्यास करत परिस्थिती बदलण्याचा ध्यास मनाशी धरुन अर्थशास्त्रामध्ये पदवी पूर्ण करत बीएड केले. मात्र, या सर्वांमध्ये तिला कर्करोगाने ग्रासले. त्यामुळे तिची मोठा अधिकारी बनणे आणि लाल दिव्याच्या गाडीची इच्छा ही अपूर्णच राहिली. कॅन्सर ग्रस्तासाठी समाजात राहून काम करण्याची इच्छा होती. मात्र, हे नियतीला मंजूर नव्हते. तिचा  (5 नोव्हेंबर) उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. सविताला काही क्षणाचा का होईना आनंद देण्याचा प्रयत्न बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला होता. 8 मार्च ‘महिला दिनी’ सविताला एक दिवसाचे आमदार त्यांनी केले होते. मात्र, लाल दिव्याच्या गाडीतून फिरण्याची इच्छा या तरुणीची अपूर्णच राहिली. सविताच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.