महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर, मुंबई लोकलच्या फेऱ्याही करणार कमी, वडेट्टीवार यांचे वक्तव्य

महाराष्ट्रातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर

0

नागपूर :महाराष्ट्रातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता, राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. तसेच मुंबई लोकलच्या फेऱ्याही कमी करण्याबाबत विचार सुरु असल्याचे मोठे आणि महत्त्वाचे वक्तव्य राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

विजय वडेट्टीवर नेमके काय म्हणाले…?
महाराष्ट्रातील एकूण वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची बाब आहे. शासन पातळीवर उपाययोजना सुरू आहेत. उपाययोजना जरी सुरू असल्या तरी त्याचा रिझल्ट काय होईल, हे आज सांगता येत नसले तरी महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे, असे आपल्याला म्हणता येईल, असे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले. आताच्या स्थितीत लॉकडाऊन परवडणारे नाही, अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे; पण रुग्णवाढ होत आहे, हे गंभीर आहे. राज्यातील काही शहरात कडक निर्बंध घ्यावे लागतील, असे सांगत लॉकडाऊनचा सूचक इशारा मंत्री वडेट्टीवार यांनी दिला आहे.

मुंबईच्या लोकल फेऱ्या कमी होणार? महाराष्ट्रात लॉकडाऊन?

विदर्भातील चार राज्यांत कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. महाराष्ट्रही कोरोनाच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे सरकार गंभीर असल्यानेच अधिवेशनचा कामकाजाचा कालावधी आठ दिवसांचा ठेवण्यात आला आहे, असे सांगतानाच मुंबईतही कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्याने मुंबईतील लोकल फेऱ्या कमी करण्याचा विचार सुरू आहे, असेही ते म्हणाले. मुंबईत लोकलमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई लोकलच्या फेऱ्या कमी करण्याबाबत विचार

मुंबईत सर्वसामान्यांना लोक सेवा प्रवास सुरू केल्यानंतर कोरोनाचे आकडे वाढायला सुरुवात झाल्याचे समोर आले आहे. यावर वडेट्टीवार म्हणाले, “मुंबई लोकलमध्ये गर्दी कशी कमी होईल, याचा विचार सुरू आहे. तसेच मुंबई लोकलच्या फेऱ्या कमी करण्याबाबत विचार” असल्याची महत्त्वाची माहिती त्यांनी दिली.

पोहरादेवीच्या गर्दीला जबाबदार असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल

मंत्री संजय राठोड यांच्यावर प्रश्न विचारला असता, वडेट्टीवार यांनी थेट प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले, या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालणार नाही.
पोहरादेवीच्या गर्दीला जबाबदार असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे वडेट्टीवार म्हणाले.

विदर्भात परिस्थिती गंभीर

विदर्भातील चार जिल्ह्यांतील परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. मंगलकार्यालयांवर वॉच ठेवण्यात येत आहे. तसेच सिनेमागृहे बंद करण्याचा विचार सुरू आहे. विदर्भात एक बैठक घेऊन कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने काही कठोर निर्णय घेण्यात येणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.