औरंगाबाद-बीड महामार्गावर थरार, धावत्या जीपने घेतला पेट
वडीगोद्रीजवळील या घटनेत जीप व आतील कागदपत्रे, साहित्या आगीत जळून भस्मसात
वडीगोद्री : औरंगाबाद-बीड महामार्गावर रविवारी रात्री सात वाजता धावत्या जीपने पेट घेतला. वडीगोद्रीजवळील या घटनेत जीप जळून खाक झाली. या वाहनातून इनामदार कुटुंबातील पाच सदस्य जात होते.
बीड येथून औरंगाबादकडे रविवारी रात्री सात वाजेच्या सुमारास खलील इनामदार कुटुंबातील पाच सदस्य जात होते. वडीगोद्री परिसरात आल्यानंतर जीपच्या इंजिनमधून धूर येऊ लागला. त्यामुळे जाप थांबवून इनामदार यांनी पाहिले असता इंजिनने पेट घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर कुटुंबांतील सदस्यांनी प्रसंगावधान राखत जीप बाहेर धाव घेतली. अशातच जीपने पेट घेतला. त्यामुळे पेटलेल्या भागावर माती टाकून आग रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र आागीचे लोळ वाढत राहिले. त्यानंतर जीप व आतील कागदपत्रे, साहित्या आगीत जळून खाक झाले. घटनास्थळी पोलिस निरीक्षक शीीतलकुमार बल्लाळ यांनी भेट दिली.