औरंगाबाद : शिवसेना विभागप्रमुख नागेश कुठारे यांच्या पुढाकाराने परिसरातील नागरिकांसमवेत शपथ घेऊन वाळूज महानगरातील ए एस क्लब चौकात मास्क वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहीम शिवसेनेच्या वतीने औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे ,शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे , आमदार संजय शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहीम शिवसेनेच्या वतीने औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे ,शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे , आमदार संजय शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. यावेळी शिवसेना विभागप्रमुख नागेश कुठारे यांच्या पुढाकाराने परिसरातील नागरिकांसमवेत शपथ घेऊन वाळूज महानगरातील ए एस क्लब चौकात मास्क वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात तालुका प्रमुख हनुमंत भोंडवे, पोलिस निरीक्षक शेषराव उदार, शिवसेना विभागप्रमुख नागेश कुठारे यांची प्रमुख उपस्थिती हाेती. कार्यक्रमात बी.जे.गायकवाड यांनी उपस्थितांना प्रतिज्ञा दिली. या कार्यक्रमास काकासाहेब बुट्टे,शीतल गंगवाल, दयालसिंग कुंवर,राकेश शहाणे,चंद्रकांत चोरडिया, पंढरीनाथ जगताप,प्रवीण भांगे, कल्पना वाघमारे, रावसाहेब कदम,अमोल साळुंके, विशाल तांगडे, समाधान मराठे, विनायक पडुळे, गोपालजी अग्रवाल,करण शेषवारे, गोडेकर राजेश्वर,निलेश भारती, रामेश्वर राऊत, शिवाजी सातपल्ले, मनोजसिंग राजपूत, शरदकुमार शेट्टी,करण बोरडे सह आदीं उपस्थिती हाेते.