परभणी जिल्हा परिषदेमधील कार्यालयीन अधीक्षकाला अटक

बाेगस प्रावीण्य प्रमाणपत्र विक्री करणारे रॅकेट सध्या राज्यभर कार्यरत

0

परभणी  : बाेगस क्रीडा प्रावीण्य प्रमाणपत्र प्रकरणी परभणीच्या जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागाचा कार्यालयीन अधीक्षक संताेष गाेपीनाथ कठाळे याला नागपूरच्या पाेलिस पथकाने रविवारी अटक केली.

 परभणीच्या जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागाचा कार्यालयीन अधीक्षक संताेष गाेपीनाथ कठाळे याला नागपूरच्या पाेलिस पथकाने रविवारी अटक केली. त्याच्या घरातून मानकापूर पाेलिस ठाण्याच्या पथकाने बनावट प्रावीण्य प्रमाणपत्रे, १७ रबरी शिक्के, काेरे धनादेश आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. याप्रकरणी कठाळेविरुद्ध नवा माेंढा ठाण्यात गुन्हा दाखल केला. परभणीतून दुसरा आराेपी अटकेत : नागपूरच्या पाेलिस पथकाने परभणी शहरातून हा दुसरा आराेपी पकडला. यापूर्वी गेल्या महिन्यात कल्याण मुरकुटेला अटक केली हाेती. त्यामुळे या प्रकरणाच्या जाळ्यात परभणीतील आणखी कोणते बडे मासे अडकणार, अशी चर्चा सुरू आहे. बाेगस प्रावीण्य प्रमाणपत्र विक्री करणारे रॅकेट सध्या राज्यभर कार्यरत आहे. याप्रकरणी १७ जण मानकापूरच्या तपास पथकाच्या रडावर आहेत. यातील १० जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली. यातील ७ जण फरार आहेत. याप्रकरणी आता पोलिस पथकाने आतापर्यंत एक वर्ग-२ अधिकारी पकडला असून यापूर्वी अटक केलेल्यांमध्ये तीन शिक्षक आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.