कॉलेजच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारणा-या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

0

औरंगाबाद : एमआयटी नर्सिंग महाविद्यालयातील सचिन वाघ या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सचिनने मंगळवारी (10 एप्रिल) सकाळी 11 वाजेच्या दरम्यान महाविद्यालयातील इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला कमलनयन बजाज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र पहाटे त्याचा उचारादरम्यान मृत्यू झाला.

फि भरण्यास पैसे नसल्याले सचिनला परिक्षेला बसू न दिल्याने त्याने असे कृत्य केल्याचे सुरुवातीला म्हटले जात होते. मात्र सचिनला कॉपी करताना पकडल्याने त्याने हा प्रकार केल्याचे महाविद्यालय प्रशासनाचे म्हणणे आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या सांगण्यानुसार, मंगळवारी सकाळी 9.30 वाजता परिक्षा सुरु झाली. त्यानंतर पाऊस तासाने सचिनकडे कॉपी सापडली. कॉपी पकडून त्याची उत्तरपत्रिका जप्त करून घेतली आणि त्याच्या वडिलांना मोबाईल वरून संपर्क साधून याबाबत कळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा वडिलांशी संपर्क होऊ शकला नाही. अखेर त्याच्याकडून घडलेला प्रकार लिहून घेण्यात आला आणि दुस-या दिवशी परिक्षेला येण्यास सांगितले.

मयत सचिन वाघ

सचिन पाचव्या मजल्यावर गेल्यानंतर त्याने मित्रांना फोन केले. नंतर त्याने मित्रांना मी आत्महत्या करत असल्याचे सांगितले. मित्रांशी बोलणे झाल्यानंतर सचिनने पाचव्या मजल्यावरील जिन्याजवळ असलेल्या खिडकीतून उडी मारली आणि तो पहिल्या मजल्यावर जाऊन कोसळला. सचिन उडी मारत असल्याचे काहींच्या लक्षात आल्यानंतर त्याला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी ओरडून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने ऐकले नाही. यावेळी काही विद्यार्थ्यांनी त्याचा व्हिडिओ काढला.

सचिनला मित्रांनी खालून असे करू नको असे ओरडून सांगत होते, मात्र मित्रांनी काही करण्याच्या आतच त्याने उडी मारली. या प्रकरणाची समितीमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचे महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सांगितले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.