गडचिरोलीत टिपागड ‘दलम’चा कुख्यात कमांडर यशवंत बोगाला पत्नीसह अटक

पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्याकडून गडचिरोली पोलिस दलाचे अभिनंदन

0

गडचिरोली : गडचिरोलीत टिपागड ‘दलम’चा कुख्यात कमांडर यशवंत बोगा याला पत्नीसह अटक केली. 2019-20 वर्षात गडचिरोली पोलिस दलाने वरिष्ठ नक्षलवादी कॅडरचे कंबरडेच मोडले. गेल्या दोन वर्षांत 2 विभागीय नक्षल समिती सदस्य -8 उपकमांडर-4 दलम कमांडरला अटक केली. पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्याकडून गडचिरोली पोलिस दलाचे अभिनंदन केले. दुसऱ्या एका घटनेत दोन जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. शासनाने एकूण 9 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
गडचिरोली पोलिस दलाच्या नक्षलविरोधी अभियानाला आज मोठे यश मिळाले आहे. गडचिरोली पोलिस दलाने जहाल वरिष्ठ नक्षलवादी व टिपागड दलमचा डिव्हीसीएम यशवंत ऊर्फ दयाराम अंकलु बोगा -35 वर्ष याला त्याची पत्नी व जहाल नक्षली टिपागड ‘दलम’ सदस्य शारदा ऊर्फ सुमित्रा पितुराम नैताम वय 32 वर्ष यांना आज अटक करण्यात यश मिळवले. जहाल नक्षली यशवंत बोगा हा सन 2009 मध्ये टिपागड ‘दलम’मध्ये भरती होऊन नक्षल चळवळीत दाखल झाला होता. सध्या तो टिपागड दलमच्या डीव्हीसीएम पदावर कार्यरत होता. त्याच्यावर गडचिरोली जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात एकूण 78 गुन्हे दाखल आहेत. हत्तीगोटा, मरकेगाव हत्याकांड आणि दादापूर भीषण जाळपोळीत तो पोलिसांना हवा होता. त्याच्यावर 16 लाख रुपयांचे बक्षीस होते. त्याची पत्नी शारदा नैताम याच ‘दलम’मध्ये सदस्य होती. तिच्यावर 47 गंभीर गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर 2 लाखांचे बक्षीस होते. गडचिरोली पोलिस दलाने सन 2019- 20 मध्ये ऐतिहासिक कामगिरीची नोंद करत नक्षलवाद्यांच्या वरिष्ठ कॅडरला लक्ष्य केले. गेल्या दोन वर्षात गडचिरोली पोलीस दलाने 2 डिकेएसझेडसी सदस्य, 8 डिव्हीसीएस, 4 दलम कमांडर व 3 दलम उपकमांडर यांना अटक, ठार अथवा त्याचे आत्मसमर्पण करण्यात यश मिळविले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.