कुख्यात गुंड फिरोज मेंटलने पोलिसांवर सोडले कुत्रे, …थरारानंतर गुंडाला अटक

फिरोज मेंटलवर गंभीर स्वरुपाचे 22 गुन्हे दाखल

0

कल्याण : कल्याणमध्ये कुख्यात गुंडाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर गुंडाने त्यांच्या घरातील  दोन डॉबरमॅन कुत्रे सोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला. तरीदेखील पोलिसांनी कुख्यात गुंड फिरोज मेंटलला शिताफीने अटक केली. कल्याणच्या वालघुनी परिसरात कुख्यात गुंड फिरोज मेंटलची अनेक वर्षांपासून दहशत आहे. फिरोज मेंटलवर गंभीर स्वरुपाचे 22 गुन्हे दाखल आहेत. असा कोणताही ही गुन्हा नाही जो त्याने केलेला नाही. हा जेवढा सराईत आहे. तेव्हढाच विचित्र डोक्याचाही आहे. तो कोणावरही हल्ला करतो. समोर पोलिस आहे की सामान्य माणूस त्याला काही फरक पडत नाही. त्याच्या या सरफिरा वृत्तीमुळेच त्याला फिरोज मेंटल हे नाव पडले.

2018 मध्ये ठाण्याला कल्याण न्यायालयात आणले असताना त्याने पोलिसांसोबत भांडण केले होते. हा तुरुंगामध्ये होता. तुरुंगामधून बाहेर आल्यावर तो वॉन्टेड होता. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांना माहिती मिळाली की, मेंटल त्याच्या वालधुनी येथील घरी आला. पोलिस अधिकारी दीपक सरोदे, गणेश कुंभार यांचे पथक त्याला पकडण्यासाठी पोहचले. फिरोज मेंटलने पोलिसांच्या अंगावर दोन डॉबरमॅन कुत्रे सोडले. कुत्रे आणि पोलिस यांच्यात संघर्ष सुरू होता. याचा फायदा घेत मेंटल हा पळून गेला. मात्र, कुत्र्यांना कसेबसे चकवीत अखेर पोलिसांनी फिरोज मेंटलला  तासाभरात जेरबंद केले. फिरोज मेंटलपुढे त्याच्या मागे डॉबरमॅन कुत्रे आणि या कुत्र्यांच्या मागे पोलिस हा थरार एक तासभर चालला. एखाद्या चित्रपटात घडते, तशी ही घटन घडली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.