पंढरपूर दुर्घटनेची दखल, दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखलचे निर्देश

अजित पवार यांनी राज्यातील पूरस्थितीचा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

0

मुंबई : पंढरपूरच्या दुर्घटनेस जबाबदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. अजित पवार यांनी आज मंत्रालयात राज्यातील पूरस्थितीचा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.

पंढरपूर शहरातील चंद्रभागा नदीकडेला नव्याने बांधण्यात येत असलेल्या कुंभार घाटाची भिंत कोसळली. घाटाच्या भिंतीच्या आडोशाला उभ्या असलेल्या आठ जणांपैकी सहा जणांचा ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यू झाला आहे. मंगेश गोपाळ अभंगराव(वय 35), राधाबाई गोपाळ (वय 50), पिलू उमेश जगताप (वय 13), गोपाळ लक्ष्मण अभंगराव (वय 70), आणि दोन वारकरी महिलांचा मृत्यू झाला. दोन जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी दिली. घाटाच्या भिंतीच्या आडोशाला आठ जण बसले होते. भिंत कोसळल्यानंतर सर्व जण ढिगाऱ्याखाली दबले. यामध्ये चार महिला व चार पुरुषांचा समावेश होता. सहा जणांचा जागीच मृत्यु झाला तर दोन जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश आले. पंढरपूर येथील  या दुर्घटनेची दखल घेत दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश अजित पवारांनी दिले आहेत.  राज्याच्या कोकण, पश्चिम व मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, विदर्भासह अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेती व घरांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची माहिती घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित नुकसानीचे पंचनामे तात्काळ सुरु करावेत, असे निर्देश दिले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.