मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे मंत्रिमंडळ; नव्या चेहेऱ्यांना संधी, भाजपचा वरचष्मा

भाजपची नवी खेळी : ज्येष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा पत्ता कट

0

पाटणा : नितीश कुमार बिहारचे सातवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली . राजभवनावर हा शपविधी सोहळा झाला. राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या शपथविधी समारंभाला उपस्थित होते. भाजपने नवी खेळी करत ज्येष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा पत्ता कट केला.

बिहारचे सातवे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार  यांनी शपथ घेतली . राजभवनावर हा शपविधी सोहळा  पार पडला. राज्यपाल फागू चौहान यांनी नितीश कुमार  यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या शपथविधी समारंभाला उपस्थित होते. भाजपने नवी खेळी करत ज्येष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा पत्ता कट केला.त्यांना दिल्लीत जबाबदारी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्रिपदासाठी भाजपने तारकिशोर प्रसाद  आणि रेणू देवी यांची निवड केली आहे. नितीश कुमार यांच्यानंतर भाजपच्या तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांनी शपथ घेतली. त्यानंतर जेडीयूच्या वतीने विजय चौधरी, विजेंद्र यादव, अशोक चौधरी, मेवालाल चौधरी, शीला कुमारी यांनी शपथ घेतली. शीला कुमारी या पहिल्यांदाच मंत्री झाल्या आहेत. हिंदुस्तानी आवाम मोर्चाच्या वतीने संतोष सुमन तर विकासशील इंसान पार्टीच्या वतीने मुकेश सहानी यांनी शपथ घेतली तर भाजपच्या वतीने तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांच्याशिवाय  मंगल पांडेय, अमरेंद्र प्रताप, रामप्रीत पासवान, जीवेश कुमार, रामसूरत राय यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपच्या  वाटाघाटीमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराष्ट्रातील जागा वाटपापासून ते सत्तेतल्या वाटणीपर्यंत सगळा अनुभव पाठीशी असल्याने पक्षनेतृत्वाने फडणवीसांना ही मोठी जबाबदारी दिली होती. या निवडणुकीत एनडीएला 125 जागा मिळाल्या आहेत. त्यात भाजप 73, जेडीयू 43, हिंदुस्तान आवाम मोर्चा आणि विकास इंसाफ पार्टीला प्रत्येकी 4 जागा मिळाल्या आहेत. या पक्षांना त्यांना मिळालेल्या जागांप्रमाणे मंत्रिपदं देण्यात आली आहेत. आरजेडी आणि काँग्रेससह महाआघाडीने या शपथविधी कार्यक्रमावर बहिष्कार घातला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.