उद्या नितीश कुमार घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, …असे नवे मंत्रिमंडळ

भाजपचे सुशील कुमार मोदीच उपमुख्यमंत्री, ,सोमवारी दुपारी शपथविधीचा कार्यक्रम

0

पाटणा : बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत  सुरू असलेली चर्चा आता संपणार . नितीश कुमार सोमवारी (16 नोव्हेंबर) मुख्यमंत्रिपदाची शपध घेणार आहेत. तर भाजपचे सुशील कुमार मोदी ( हेच उपमुख्यमंत्री असतील असंही आता स्पष्ट झाले आहे. नितीश कुमार हेच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट असले तरी गेल्या काही दिवसांमध्ये त्याबद्दल चर्चा रंगली होती. त्या सर्व चर्चांना मिळणार पूर्णविराम.

नितीश कुमार हेच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट असले तरी गेल्या काही दिवसांमध्ये त्याबद्दल चर्चा रंगली होती. त्या सर्व चर्चांना मिळणार पूर्णविराम. शपधविधीची तयारी सुरू झाली असून मंत्रिमंडळ कसे असेल याबाबत सर्वांनाच उत्सुकता निर्माण झाली आहे.  दुपारी हा शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग हे पाटण्यात दाखल झाल्यानंतर सगळे चक्र वेगात फिरली. रविवारी नितीश कुमार यांची एनडीएच्या नेतेपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर राजनाथ सिंग, नितीश कुमार आणि घटकपक्षांच्या नेत्यांची बैठक झाली त्यात मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाली. भाजपची संख्या जास्त असल्याने भाजपला मंत्रिमंडळात जास्त जागा आणि महत्त्वाची खाती मिळू शकतात. जेडीयूला कमी जागा मिळाल्याने आता भाजप वरचढ राहणार आहे. तर घटक पक्षांचे किती सदस्य मंत्रिमंडळात असावेत याबाबत चर्चा सुरू असून संध्याकाळी सगळे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यांना त्यांच्या संख्याबळाच्या प्रमाणात पदं मिळणार आहेत. बिहारचे भाजप प्रभारी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही पाटण्यात दाखल झाले आहेत. सत्तावाटपाच्या चर्चेत त्यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शपधविधी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत  का हे अजुन स्पष्ट झालेले नाही. बिहार विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश संपादन केल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास आणखी बुलंद झाला. त्यामुळे भाजपनं 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

जेपी नड्डा यांनी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची काय रणनीती असेल, यावर आतापासून काम सुरू केले आहे. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने गमावलेल्या जागांवर जेपी नड्डा यांचा फोकस राहाणार. 2024 च्या निवडणुकीत या जागा कशा काबिज करता येतील, यावर भाजपची रणनीती असणार आहे. लोकसभा निवडणूक 2024 ची रणनीती ठरवण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा  यांनी मास्टर प्लान तयार केला आहे. नड्डा लवकरच संपूर्ण देशाचा दौरा करणार आहेत. पक्ष आणखी मजबूत करणे, हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे. नड्डा हे लवकरच 100 दिवसांचा भारत दौऱ्यावर निघणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.