बिहारच्या मुख्यमंत्रीपदी सातव्यांदा शपथ घेणार नितीश कुमार

निवडणुकीत तीन मिळवला विजय, पण शपथ घेतली सहा वेळा

0

पाटणा : बिहार विधानसभेच्या  अटीतटीच्या निवडणुकीत अखेर एनडीएला बहुमत मिळाले असा दावा भाजपने केला आहे. यासह सातव्यांदा नितीश कुमार  बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.

अटीतटीच्या निवडणुकीत अखेर एनडीएला बहुमत मिळाले, असा दावा भाजपने केला आहे. यासह सातव्यांदा नितीश कुमार  बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. बिहारमध्ये आरजेडी हटवून मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेल्या नितीश कुमार यांनी सत्ता हातातून जाऊ दिली नाही.  2005 मध्ये बहुमत घेऊन नितीश पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले मात्र 2000 च्या सुरुवातीलाच त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, काही दिवसांत त्यांचे सरकार बहुमत सिद्ध करू न शकल्यामुळे पडले. त्यानंतर 2005 मध्ये नितीश कुमार हे भाजप आणि जेडीयूच्या व्यापक निवडणूक प्रचाराचा चेहरा बनले. राष्ट्रीय जनता दलाच्या दीर्घ राजवटीने निर्माण झालेल्या रागाचा नितीश यांना थेट फायदा झाला आणि 24नोव्हेंबर 2005 रोजी पुन्हा एकदा त्यांनी मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली. यावेळी त्यांचे सरकार पाच वर्षे चालले. 2010 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप-जेडीयू युतीवर राज्यातील जनतेने विश्वास व्यक्त केला. यानंतर 26 नोव्हेंबर 2010 रोजी नितीश यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली. 2014 मधील लोकसभा निवडणुकीत झालेल्या वाईट पराभवानंतर नितीश कुमार यांनी राजीनामा दिला होता. हा त्यांचा नैतिक निर्णय मानला गेला. ते आपल्या जुन्या साखी भाजपपासून विभक्त झाले होते आणि लोकसभा निवडणुकीत भाजपने जबरदस्त कामगिरी केली होती. नितीश यांनी जीतनराम मांझी यांना बिहारचे मुख्यमंत्री केले. परंतु त्यानंतर 22 फेब्रुवारी 2015 रोजी त्यांनी पुन्हा चौथ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. विधानसभा निवडणुका त्याच वर्षी बिहारमध्ये घेण्यात आल्या. दशकांपासून एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले नितीशकुमार आणि लालू प्रसाद यादव एक झाले. महायुतीच्या अंतर्गत या दोघांनी एनडीएसमोर निवडणूक लढविली. दोन्ही पक्षांना ऐतिहासिक विजय मिळाला आणि 20 नोव्हेंबर 2015 रोजी नितीशकुमार यांनी 5 व्यांदा वेळी शपथ घेतली. जवळपास दोन वर्षांनी पुन्हा नितीशकुमार यांनी आरजेडीशी मतभेद झाले आणि ते पुन्हा भाजपमध्ये दाखल झाले. जुने सहकारी पुन्हा एकदा एकत्र आले. पण मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर नितीश यांची पकड तशीच राहिली. 27 जुलै 2017 रोजी सहाव्यांदा त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता पुन्हा एकदा NDAने निवडणूक जिंकली. त्यामुळे आता नितीशकुमार सातव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना दिसतील.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.