नितीश कुमार ‘या’ दिवशी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता; करणार ‘हा’ विक्रम

दोन दशकांमध्ये सात वेळा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या विशिष्ट श्रेणीत

0

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत सत्तारूढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत प्राप्त झाल्यानंतर सर्वांच्या नजरा आता पुढील सरकार स्थापनेवर लागले आहे. दिवाळीनंतर नव्या सरकारची स्थापना होण्याची शक्यता आहे. ही माहिती देत सूत्रांनी जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनतील बुधवारी सांगितले.

बिहारमध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदावर राहण्याच्या विक्रमाकडे वाटचाल करणारे नितीश कुमार पुढील आठवड्यात सोमवारी १६ नोव्हेंबर किंवा त्यानंतर शपथ ग्रहण करण्याची शक्यता आहे. या पूर्वी नोव्हेंबरच्या शेवटी वर्तमान सरकारचा कार्यकाळ समाप्त होत असल्याने ते राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपवू शकतात. बिहारमध्ये आतापर्यंत सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रिपदी राहण्याचा विक्रम श्रीकृष्ण सिंह यांच्या नावे आहे. ते या पदावर १७ वर्षे ५२ दिवस राहिले. नितीश कुमार या पदावर १४ वर्षे ८२ दिवस राहिले आहेत. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार यांचे ना गेल्या दोन दशकांमध्ये सात वेळा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या विशिष्ट श्रेणीत येईल.

नितीश कुमार यांनी पहिल्यांदा २००० मध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र बहुमतासाठी आवश्यक तितक्या आमदारांचे समर्थन न मिळाल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला. २००५ मध्ये एनडीएला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर नितीश कुमार मुख्यमंत्री बनले. २०१४ मध्ये लोकसभा निवणुकीत जेडीयूची सुमार कामगिरी पाहता नैतिक आधारावर नीतीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा त्याग केला. मात्र, एका वर्षांच्या आतच ते सत्तेवर परतले. २०१५ मध्ये नितीश कुमार यांनी जेडीयू आणि लालूप्रसाद यांच्या आरजेडीने महाआघाडी स्थापन करून निवडणुका लढल्या. यात त्यांना विजय प्राप्त झाला. मात्र, तेव्हा तत्कालीन उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे नाव मनी लाँड्रिंग प्रकरणात आल्यानंतर त्यांनी २०१७ मध्ये राजीनामा दिला. नीतीश कुमार यांनी पुढच्याच दिवशी भाजपच्या समर्थनाने नवे सरकार स्थापन केले होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.