नितीशकुमार आणि पंतप्रधान मोदी हे बिहारच्या पराभवाचे वाटेकरी -धैर्यशील मानें

अभिनेता सुशात सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणावरूनही भाजपवर साधला निशाणा

0

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकांचा निकाल अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहेत. अशात आता सर्वच स्तरांतून राजकीय प्रतिक्रिया उमटत आहे. बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. ‘बिहारमध्ये नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव आहे. या पराभवाचे वाटेकरी नितीश आणि मोदी असणार आहेत.’ असे ठाम मत धैर्यशील माने यांनी व्यक्त केलं आहे. ते दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी बोलताना त्यांनी अभिनेता सुशात सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणावरूनही भाजपवर निशाणा साधला आहे. बिहार निवडणुकीमध्ये सुशांत सिंग राजपूत हा मुद्दाच नव्हता. परंतु, भाजपने हा मुद्दा बनवला. पण आता महाराष्ट्रातून बिहारमध्ये परिवर्तनाची लाट गेली आहे. तेजस्वी यादव यांच्या रूपाने बिहारमध्ये परिवर्तन आले. आता संपुर्ण देशात परिवर्तन येईल, असा विश्वास धैर्यशील माने यांनी दाखवला आहे. इकतंच नाही तर ‘महाराष्ट्रामध्ये कोणत्याही व्यक्तीवर अन्याय झाला नाही तर न्याय मिळवून दिला जातो. बिहारमध्येही असेच होणार. भाजपने छोट्या पक्षाला सोडले, परंतु काँग्रेस पक्षाने सर्व छोट्या पक्षांना सोबत घेतले. भविष्यात काँग्रेस पक्ष मोठ्या आघाडीने वाढणार आहे. राहुल गांधी यांच्यावर अनेकांचा विश्वास आहे.’असेही धैर्यशील माने यांनी म्हटले आहे. दरम्यान, बिहार निवडणुकांवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनीही ट्विट करून भाजपला चिमटे काढले आहेत. बादशाह तो वक्त होता है… इन्सान तो युं ही गुरुर करता है, असा टोला राऊत यांनी भाजपला नाव न घेता लगावला आहे. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी केलेल्या या ट्विटमुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
महाआघाडी आघाडीवर
बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलानुसार तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. त्यात आरजेडी 27, काँग्रेस 6, जेडीयू 11 आणि भाजप 20 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे आरजेडीच्या कार्यकर्त्यांनी तेजस्वी यांच्या घरासमोर जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, तेजस्वी यादव हे राष्ट्रीय जनता दलाचा (राजद) पारंपरिक मतदारसंघ असलेल्या राघोपूर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तेजस्वी यादव यांची सध्याची लोकप्रियता पाहता, राघोपूरमधून ते विक्रमी मताधिक्याने विजयी होणार का, हे पाहावे लागेल.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.