नीता अंबानी थिरकल्या मुलाच्या लग्नात, डान्स व्हिडिओ होतोय व्हायरल

0

आकाश अंबानी आणि श्लोका मेहता 9 मार्च रोजी लग्नगाठीत अडकले. मुकेश अंबानी आणि नीता अंबानीसह संपूर्ण अंबानी कुटुंबासाठी हा खास क्षण होता. लग्नानंतर अंबानी कुटुंबाने जिओ सेंटरमध्ये भव्य वेडिंह रिसेप्शनचे आयोजन केले होते. या रिसेप्शनला सर्व क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी हजेरी लावली. या रिसेप्शनमधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये नीता अंबानी यांचादेखील एका व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. त्यांनी मुलाच्या रिसेप्शनमध्ये यशोदा बनून भगवान कृष्णाच्या भजनावर नृत्य केले. त्या ‘अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम’वर नृत्य करताना दिसत आहेत.

खालील लिंकवर क्लिक करून पाहा नीता अंबानी यांच्या डान्सचा व्हिडिओ…

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.