नीरव मोदीचा नवीन लूक आला समोर, लंडनमध्ये राहतो महागड्या फ्लॅटमध्ये

0

पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) घोटाळ्यातील दोषी उद्योगपती नीरव मोदी सध्या लंडनमध्ये राहत आहे. लंडनमध्ये गेल्यानंतर नीरव मोदी वेषांतर करून फिरत आहे. ‘द टेलिग्राफ’ या लंडनच्या वृत्तपत्राने याविषयी दावा केला आहे. या वृत्तानुसार, नीरव मोदी वेस्ट अँड लंडनमध्ये वास्तव्यास असून तो 72 कोटींच्या थ्री बीएचके अपार्टमेंटमध्ये राहतो.

या वृत्तपत्रानुसार, नीरव या आपार्टमेंटचे भाडे दरमहा दीड लाख रुपये भरतो. नीरवच्या अटकेसाठी इंटरपोलने नीरवच्या अटकेसाठी रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. तरीदेखील नीरव लंडनमध्ये व्यवसाय करत आहे.
नीरव मोदी हा 13 हजार कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्यात दोषी आहे. हा घोटाळा करून नीरव फरार झाला.

शुक्रवारी त्याचा अलिबाग येथील सुमारे 100 कोटी रुपयांचा आलिशान बंगला प्रशासनाने स्फोटाने जमीनदोस्त केला. 110 डायनामाईट, 30 किलो स्फोटकांव्दारे 30 हजार चौरस फुटांच्या क्षेत्रात पसरलेला या बंगल्याचे बांधकाम अवैधरित्या केले होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.