नीरव मोदीचा 100 कोटींचा बंगला जमीनदोस्त, पाहा बंगल्याचा व्हिडिओ
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यात दोषी असलेले हि-याचे उद्योगपती नीरव मोदीचे अलीबागमधील बंगला जमीनदोस्त करण्यात आला आहे. या आलिशान बंगल्याची जिल्हाधिका-यांच्या निगराणीखाली तोडफोड करण्यात आली. हा बंगला पाडण्यासाठी डायनामाईट स्टिकचा वापर करण्यात आला.
मागील एक महिन्यापासून या बंगल्याची तोडफोड करून पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु बंगला इतका मजबूत आहे, की बंगला पाडण्यासाठी डायनामाईटचा वापर केला जात आहे.
नीरव मोदीचा हा बंगला 33 हजार स्क्वेअर फुटवर उभा आहे. मुंबईपासून 90 किलोमीटर दूर किहिम बीचवर आहे. याची किंमत 100 कोटी आहे. तसेच अवैधरित्या बांधलेला हा बंगला आज अखेर जमीनदोस्त झाला आहे.