जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये 115 पैकी फक्त 5 विद्यार्थी घेतात शिक्षणाचे धडे

0
जिल्हा परिषद हायस्कूल बिलोली (जि.नांदेड) येथील शाळेत फक्त पाच मुले शिकत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पहिली ते दहावीपर्यंत एकूण 115 पट संख्या असलेल्या या शाळेत विद्यार्थी, विद्यार्थिनी आहेत. मात्र या शाळेत फक्त 3 मुली आणि 2 मुले शिक्षण घेत आहेत. तर शिक्षक संख्या सात असून एका विद्यार्थ्याला एका शिक्षकाने शिकवले तरी दोन शिक्षक अतिरिक्त आहेत.
शिक्षकांवर लाखो रुपये खर्च केला जात आहे, परंतु विद्यार्थी संख्या कमीच आहे. आजच्या इंग्रजी शाळेच्या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या शाळा तग धरत नसल्याने दरवर्षी विद्यार्थी संख्येत घट होत असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळा टिकवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. यावरून असे लक्षात येते की, समिती व शिक्षण विभागाचे अधिकारी या शाळेकडे दुर्लक्ष करत आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.