तावडे-पंकजांनंतर आशिष शेलारांना केंद्रीय नेतृत्वाकडून नवी जबाबदारी

आशिष शेलार यांची ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचे सहप्रभारी नियुक्ती

0

मुंबई : भाजप नेते आशिष शेलार यांना केंद्रीय नेतृत्वाकडून नवी जबाबदारी  सोपवण्यात आली आहे. शेलार यांची ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका (जीएचएमसी) निवडणुकीसाठी  भाजपचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राष्ट्रीय महामंत्री भूपेंद्र यादव यांची ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका (जीएचएमसी) निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. तर कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर, महाराष्ट्रातील नेते आशिष शेलार, गुजरातचे नेते प्रदीप सिंह वाघेला आणि कर्नाटकचे नेते सतीश रेड्डी यांची सहप्रभारी म्हणून निवड केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बिहार निवडणुकीच्यानिमित्ताने राष्ट्रीय राजकारणात आपली छाप पाडल्यानंतर भाजपकडून महाराष्ट्रातील आणखी काही नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपकडून नुकतीच राज्यनिहाय प्रभारींची नवी यादी जाहीर करण्यात आली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.