दिवाळीपूर्वीच मुंबई काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची नियुक्तीची शक्यता

मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबईत होणार काँग्रेस पक्षाची पुनर्बांधणी

0

मुंबई : काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांसोबतच मुंबईचे काँग्रेस अध्यक्षही बदलण्याची शक्यता बळावली आहे. ‘म्हाडा’चे माजी अध्यक्ष अमरजीतसिंग मनहास आणि माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचे बोलले जाते. दिवाळीपूर्वीच मुंबई काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस मुंबईत पक्षाची पुनर्बांधणी केली जाणार आहे.

काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांसोबतच मुंबईचे काँग्रेस अध्यक्षही बदलण्याची शक्यता बळावली आहे. ‘म्हाडा’चे माजी अध्यक्ष अमरजीतसिंग मनहास आणि माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचे बोलले जाते. दिवाळीपूर्वीच मुंबई काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. अमरजीतसिंग मनहास, सुरेश शेट्टी, भाई जगताप, मधू चव्हाण, चरणसिंह सप्रा यांची नावे चर्चेत आहेत. विद्यमान अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या जागी पुन्हा मराठी चेहरा मिळणार, की अमराठी नेत्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवली जाणार, याची उत्सुकता आहे.

कोणाकोणाच्या नावाची चर्चा? : सुरेश शेट्टी – अंधेरी पूर्व मतदारसंघाचे माजी आमदार. शेट्टी हे आघाडी सरकारमधील माजी कॅबिनेट मंत्री. विद्यार्थी चळवळीतून नेतृत्व. ,अमरजीतसिंह मनहास : मुंबई काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उपाध्यक्ष.,
भाई जगताप : विधान परिषद आमदार. त्यांच्या आमदारकीची ही दुसरी टर्म आहे. ,भाई जगताप विधानसभेवरही निवडून गेले होते. ,मधू चव्हाण – मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष. चव्हाण भायखळा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार. मिलिंद देवरा गटातील नेते म्हणून ओळख.,
लोकसभा निवडणुकीत दणदणीत पराभव झाल्यानंतर माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर माजी खासदार आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांची निवड करण्यात आली होती.

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाचे खांदेपालट होण्याची चर्चा

बिहार विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाचे खांदेपालट होण्याची शक्यता आहे. विद्यमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या जागी महाविकास आघाडी सरकारमधील दिग्गज नेते आणि पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांची वर्णी लागण्याची चर्चा आहे. काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांचीही नावे होती. मात्र सुनील केदार यांच्या खांद्यावर पक्षाचे दिग्गज नेते राहुल गांधी जबाबदारी टाकण्याची चिन्हे आहेत. राहुल गांधी यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी जानेवारी महिन्यात निवड होण्याचे संकेत आहेत. राहुल गांधी यांच्या नवीन टीममध्ये युवकांना प्राध्यान्य देण्यात येणार आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.