राष्ट्रवादीची ऐनवेळी माघार; उपमहापौरपदाची माळ भाजपच्या गळ्यात

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपमहापौरपदाच्या निवडणूक नाट्यमय घडामोडी

0

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपमहापौरपदाच्या निवडणूक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाली. सत्ताधारी भाजप (BJP)नेत्यांच्या मनधरणीनंतर उपमहापौरपदाची निवडणूक लढवणाऱ्या राष्ट्रवादीच्या उमेदवार निकिता कदम यांनी ऐनवेळी माघार घेतली. निकिता कदम यांनी माघार घेतल्यामुळे उपमहापौरपदी भाजपचे नगरसेवक केशव घोळवे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपमहापौर तुषार हिंगे यांनी गेल्या 14 ऑक्टोबरला तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक घेण्यात आली. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार हे पीठासन अधिकारी होते. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दोन्ही उमेदवारांचे अर्ज वैध असल्याचं पीठासन अधिकाऱ्यांनी जाहीर केले. माघार घेण्यासाठी उभय उमेदवारांनी 15 मिनिटांचा अवधी देण्यात आला. भाजप उमेदवार केशव घोळवे व सभागृह नेते नामदेव ढाके यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार निकिता कदम यांच्यासह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना माघार घेण्यासाठी विनंती केली. अर्ज माघार घेण्यासाठी अवघे चार मिनिटे शिल्लक असताना कदम यांनी माघार घेतली. त्यानंतर केशव घोळवे यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. केशव घोळवे यांना उपमहापौरपदाची केवळ पाच महिन्यांसाठी संधी देण्यात आली आहे. पक्षांतर्गत वाद शमवण्यासाठी भाजपने राष्ट्रवादीपुढे लोटांगण घातल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. उपमहापौरपदासाठी सत्ताधारी भाजपकडून नगरसेवक केशव घोळवे यांनी अर्ज दाखल केला. महापालिकेत भाजपची सत्ता असताना घोळवे यांची निवड निश्चित होती. मात्र, संख्याबळ नसताना राष्ट्रवादी काँग्रेसनं उपमहापौराच्या निवडणुकीत उडी घेतली. निकिता कदम यांनी अर्ज दाखल केला. मात्र, भाजपकडून निकिता कदम यांची मनधरणी करण्यात आली. कदम यांनी ऐनवेळी मागे घेतला. त्यामुळे केशव घोळवे यांची बिनविरोध निवड झाली. पिंपरी चिंचवड-उपमहापौरपदी भाजप नगरसेवक केशव घोळवे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर महापालिकेच्या मुख्य इमारतीत समर्थकांनी एकच गर्दी केली. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा चांगलाच फज्जा उडाला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.