गिरीश महाजनांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची धडक, जामनेरमध्ये कार्यालय सुरू

भाजप नेत्याचा मतदारसंघ, जामनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुका कार्यालयाचे उद्घाटन

0

जळगाव : एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाचे परिणाम जळगाव जिल्ह्याच्या राजकारणावर दिसण्यास सुरुवात झाली आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांचा मतदारसंघ असलेल्या जामनेर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुका कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. दसऱ्याच्या मुहूर्तावर राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड, भगवान पाटील यांच्या हस्ते फित कापून तालुका कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

जामनेर हा भाजप नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांचा मतदारसंघ असून गेल्या 5 टर्म येथे भाजपची सत्ता आहे. जामनेर शहरात राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन कुणी फिरू शकत नव्हते. मात्र, अशा परिस्थितीत राष्ट्रवादी पार्टीच्या तालुका कार्यालयाचा फलक लावला आहे. आता आपल्याला जामनेर तालुक्यातील वाईट गोष्टींविरोधात काम करायचे असल्याचे वक्तव्य प्रफुल्ल लोढा यांनी केले. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला असलेल्या जामनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने कार्यालय सुरू करुन जोरदार सुरुवात केली. जामनेर तालुक्यात गेल्या कित्येक वर्षांपासून राष्ट्रवादीचा फलक लावू शकत नव्हतो, मात्र आता लावला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रफुल्ल लोढा यांनी म्हणाले. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जळगावचे राजकारण बदलण्यास सुरुवात झाली आहे. मुक्ताईनगरमध्ये भाजपला आता कार्यालयासाठी जागा शोधावी लागणार आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.