राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण

आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, कोरोना चाचणी करून घ्यावी, अशी जयंत पाटलांनी केली विनंती

0

मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील  यांना कोरोनाची लागण झाली आहे. जयंत पाटील यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली. जयंत पाटील परिवार संवाद यात्रेनिमित्त राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. त्यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरून त्यांनी ही माहिती दिली आहे.

जयंत पाटील परिवार संवाद यात्रेनिमित्त राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. त्यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरून त्यांनी ही माहिती दिली आहे. “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो. जितके कामकाज व्हर्च्युअली करणे शक्य होईल, सध्या तितके करण्याचा प्रयत्न करतो आहे. धन्यवाद” असे ट्विट जयंत पाटील यांनी केले आहे. राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेचे आयोजन सध्या राज्यभरात करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील परिवार संवाद यात्रेनिमित्त राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत.

राजेंद्र शिंगणेही कोरोना पॉझिटिव्ह

अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनाही दोन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली आहे. मंत्री शिंगणे यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. कोरोनावर मात करुन लवकरच आपल्या सेवेसाठी हजर होईन, असे राजेंद्र शिंगणे म्हणाले आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.