‘राष्ट्रवादीने खडसेंना डोक्यावर चढवले, पवारांच्या दौऱ्याने उत्तर महाराष्ट्रात भाजपला फरक पडणार नाही’

उत्तर महाराष्ट्रात भाजपला मानणारा आहे एक वर्ग. त्याठिकाणी आहेत गिरीश महाजनही

0

मुंबई : मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे यांना डोक्यावर चढवले आहे. एकनाथ खडसे यांच्यात इतकीच ताकद होती तर मग मुक्ताईनगरमधून ते स्वत:च्या मुलीला का निवडून आणू शकले नाहीत, असा सवाल भाजप नेते प्रसाद लाड यांनी उपस्थित केला.

खडसेंच्या प्रवेशानंतर शरद पवार प्रथमच उत्तर महाराष्ट्रात, तारीख आणि स्थळ ठरले
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येत्या 20 आणि 21 नोव्हेंबरला उत्तर महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर शरद पवार पहिल्यांदाच उत्तर महाराष्ट्रात जाणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडून या ठिकाणी जय्यत तयारीला सुरुवात झाली आहे. भाजप सोडल्यानंतर आता एकनाथ खडसे यांचा उलट प्रवास सुरू झाला. स्वत:चे अस्तित्व दाखवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. त्यांना काय करायचे ते करू दे, आम्ही उत्तर महाराष्ट्रात आमच्या परीने काम सुरू ठेवू, असे प्रसाद लाड यांनी सांगितले. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर आता शरद पवार उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. शरद पवार हे गेल्या 40 वर्षांपासून राजकीय दौरे करत आहेत. तो त्यांच्या आवडीचा विषय आहे. शरद पवारांनी एकनाथ खडसेंच्या उत्तर महाराष्ट्रात दौरा केला तरी भाजपला काही फरक पडणार नाही, असा दावा प्रसाद लाड यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक हल्ला करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसे यांना डोक्यावर चढवत आहे. मुळात एकनाथ खडसे यांच्यात इतकीच ताकद होती तर ते स्वत:च्या मुलीला का निवडून आणू शकले नाहीत, असा सवाल लाड यांनी उपस्थित केला.  त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात कोणी किती दौरे केले तरी भाजपचे कोणतेही नुकसान होणार नाही. उत्तर महाराष्ट्रात भाजपला मानणारा एक वर्ग आहे. त्याठिकाणी गिरीश महाजनही आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या दौऱ्याने फरक पडणार नाही. आम्ही आमचे काम करत राहू, असे प्रसाद लाड यांनी सांगितले.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.