राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा बारामतीत सहकुटुंब दिवाळी पाडवा साजरा

शरद पवार यांच्या गोविंदबागमधील निवासस्थानी पाडव्याचा सण उत्साहात

0

बारामती : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत सहकुटुंब दिवाळी पाडवा साजरा केला.  शरद पवार यांच्या गोविंदबागमधील निवासस्थानी पाडव्याचा सण उत्साहात साजरा करण्यात आला.
गोविंदबागेत पवार कुटुंबाचे पाडवा साजरा करण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्य  एकत्र जमले होते.  दिवाळी निमित्त पवार कुटुंबीय या दिवशी बारामतीमध्ये गोविंद बागेत एकत्र येतात. यावेळी सगळ्यांच्या गाठीभेटी होतात. राजकारणाच्या दगदगीत यांना एकमेकांशी बोलायलाही उसंत मिळत नाही. निमित्त होते ते दिवाळी सणाचे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत सहकुटुंब दिवाळी पाडवा साजरा केला.  शरद पवार यांच्या गोविंदबागमधील निवासस्थानी पाडव्याचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रतिभा पवार यांनी शरद पवार यांचे औक्षण केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुनेत्रा पवार यांनी ओवाळले. खासदार सुप्रिया सुळे यांनी पती सदानंद सुळे यांचे औक्षण केले. आमदार रोहित पवार यांना कुंती पवार यांनी ओवाळले. पाडव्याचा सण साजरा केल्यानंतर पवार कुटुंबीयांनी गोविंद बागेत स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.