राष्ट्रवादीचे नेते संजय शिंदेंच्या कारला अचानक आग, होरपळून त्यांचा मृत्यू

संजय शिंदे  हे नाशिक जिल्ह्यात द्राक्ष निर्यातदार व्यापारी

0

नाशिक :  नाशिकचे राष्ट्रवादीचे नेते संजय शिंदे यांच्या गाडीला अचानक आग लागली. मुंबई-आग्रा महामार्गावरून जात असताना आग लागली. दरम्यान, पिंपळगाव बसवंत टोल प्लाझाजवळ त्यांच्या कारमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचे सांगण्यात आले. त्यांनी गाडी बाजुला घेतली आणि उतरण्याचा प्रयत्न केला. परंतु गाडी लॉक झाल्याने ते कारमध्येच अडकले. या कारने पेट घेतल्याने त्यांचा गाडीतच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली. दरम्यान, कारला शॉर्टसर्कीटमुळे आग लागली. गाडीत असणाऱ्या सॅनिटायझरने पेट घेतल्याचे बोलले जात आहे.

मंगळवारी दुपारी पिंपळगाव बसवंत टोल प्लाझाजवळ ही दुर्घटना घडली. शिंदे कीटकनाशके खरेदी करण्यासाठी पिंपळगाव येथे जात असताना कारला अचानक आग लागली. वायरिंगमधील शॉर्टसर्किटमुळे त्यांच्या कारला आग लागल्याचे पोलिसांनी सांगितले. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, “आगीनंतर संजय शिंदे यांनी कार थांबवून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना बाहेर पडता आले नाही. कारण कारचे दरवाजे लॉक झाले होते. त्यानंतर वेगाने आग पसरली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. “आम्हाला गाडीच्या आत हँड सॅनिटायझरची  एक बाटली सापडली. आम्हाला असा संशय आहे की, ही आग सॅनिटायझर हा ज्वलनशील पदार्थ असल्याने आग वेगाने पसरली असावी.”राज्यातील नाशिकमधील ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते. संजय शिंदे यांच्या कारला आग मुंबई-आग्रा महामार्गावरून जात असताना आग लागली. दरम्यान, पिंपळगाव बसवंत टोल प्लाझाजवळ त्यांच्या कारमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचे सांगण्यात आले. या आगीत संजय शिंदे यांना मृत्यू झाला. संजय शिंदे  हे नाशिक जिल्ह्यात द्राक्ष निर्यात करणारे व्यापारी होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.