माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत विचार करेन – शरद पवार

0

माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी विनंती विजयसिंह मोहिते पाटील आणि जवळपास सर्व वरिष्ठ सहकार-यांनी केली, परंतु माझी निवडणूक लढण्याची इच्छा नसून कोणताही निर्णय घेणार नाही, पण विचार करून निर्णय घेऊन, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

त्यामुळे पवार यांनी केलेल्या या विधानानंतर आता या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळते, याकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत उत्सूकता लागली आहे. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राष्ट्रवादीच्या इच्छुकांची शुक्रवारी पुण्यातल्या बारामती होस्टेलमध्ये बैठक घेण्यात आली.

या बैठकीत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी पवार यांनी माढामधून निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला होता. तसेच पक्षातील वरिष्ठ नेते म्हणाले, आम्ही तुमचे सर्व धोरणात्मक निर्णय ऐकतो. माढ्यामध्ये निवडणूक लढण्याबाबत आमचे ऐका. असा आग्रह त्यांनी धरला. यावर पवार म्हणाले, की याबाबत मी विचार करून ठरवू.

मात्र पवार यांच्या गुगलीमुळे माढ्याचा उमेदवारीचा गुंता वाढला आहे. कारण या मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील व माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख हे इच्छुक आहेत.

अण्णा हजारेंवर बोलणे टाळले…
अण्णा हजारे यांच्या उपोषणाबाबत विचारले असता, पवार म्हणाले, या विषयावर आपण काहीच बोलू इच्छित नाही. मी त्यांच्यासंबंधीच्या बातम्या, चर्चा वाचणे व पाहणे सोडून दिले आहे. असा टोला अण्णा हजारेंना लगावला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.